क्षारपड जमीन सुधारणा संस्थांना ११.९० लाखांचे अनुदान वाटप

कोल्हापूर : उर्जांकुर श्री दत्त पॉवर कंपनी लिमिटेड दत्तनगर शिरोळ यांच्या वतीने शिरोळ तालुक्यातील दहा क्षारपड जमीन सुधारणा संस्थांना ११ लाख ९० हजार ५०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. एकरी ५०० रुपये प्रमाणे २ हजार ३८१ एकर क्षेत्रासाठी हे अनुदान वाटप झाले.
 Alkaline land improvement institutes Allocation of grant of Rs. 11.90 lakhs

क्षारपड जमीन सुधारणा कामाच्या सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सीएसआर फंडातून हे अनुदान देण्यात आले. येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या सभागृहात कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते कागवाड, घालवाड, कुटवाड, हसूर, शिरोळ, औरवाड, हेरवाड, धरणगुत्ती, राजापूर व जुगुळ येथील दहा क्षारपड जमीन सुधारणा संस्थांना धनादेश प्रदान करण्यात आले.

पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांची साथ आणि नवी दृष्टी घेऊन आगामी काळात काम करण्याची गरज आहे. प्रयोगांतून शेती सुधारणा कामांमध्ये यश मिळू शकते.’’  संचालक शेखर पाटील, आनंद कुलकर्णी, सुकुमार हुक्किरे, सतीश खोंद्रे, भाऊसो खोंद्रे, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील आदी उपस्थित होते. दिलीप जाधव यांनी आभार मानले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com