agriculture news in Marathi all area will be consider of tur for procurement on MSP Maharashtra | Agrowon

हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण क्षेत्र ग्राह्य धरणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत अत्यंत कमी आहे. आंतरपीक म्हणून मोठ्या क्षेत्रावर लागवड केली जाते. नेमकी हीच अडचण यंदा शेतकऱ्यांना तूर विकताना मारक बनली होती. हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विकताना द्यावा लागणाऱ्या सातबारा उताऱ्यात आंतरपीक म्हणून लागवड झालेल्या तुरीचे क्षेत्र येत नव्हते. आता शासनाने याची दखल घेत सोयाबीन पिकासह आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीचे लागवडीखालील पूर्ण क्षेत्र ग्राह्य धरावे, अशी सूचना केली आहे. तसेच तुरीची उत्पादकता निश्‍चित करण्याच्या सूचनादेखील संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत अत्यंत कमी आहे. आंतरपीक म्हणून मोठ्या क्षेत्रावर लागवड केली जाते. नेमकी हीच अडचण यंदा शेतकऱ्यांना तूर विकताना मारक बनली होती. हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विकताना द्यावा लागणाऱ्या सातबारा उताऱ्यात आंतरपीक म्हणून लागवड झालेल्या तुरीचे क्षेत्र येत नव्हते. आता शासनाने याची दखल घेत सोयाबीन पिकासह आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीचे लागवडीखालील पूर्ण क्षेत्र ग्राह्य धरावे, अशी सूचना केली आहे. तसेच तुरीची उत्पादकता निश्‍चित करण्याच्या सूचनादेखील संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात यंदा आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हेक्टरी चार क्विंटल ७८ किलो तूर खरेदी करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. यामुळे तूर उत्पादक चिंतित झाले होते. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे शक्य झाले नव्हते. जिल्ह्यात खरिप हंगामात सोयाबीन व तूर ही मुख्य पिके आहेत. त्यामुळे सोयाबीन या पिकात शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करतात. शेतकऱ्यांना तूर या पिकापासून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असते.

यंदा परतीच्या पावसाने तुरीचे पीक चांगले बहरले होते. त्यामुळे शेतकऱ्‍यांना तुरीच्या पिकाने देखील चांगलाच हातभार दिला. मात्र, खुल्या बाजारात तुरीला अवघा चार हजार रुपये दर मिळत होता. तर आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या तुरीला पाच हजार ८०० रुपये दर दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे मोठे नुकसान सहन करावे लागत होते.

खरेदी मर्यादेमुळे नाराजी
आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात हेक्टरी चार क्विंटल ७८ किलो एवढीच तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे. त्यातच बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणेदेखील शक्य झाले नाही. ही बाब पाहता आता ऑनलाइन नोंदणीकरिता १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सोयाबीन पिकांसोबत आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीच्या लागवडीखालील पूर्ण क्षेत्र ग्राह्य धरून, उत्पादकता निश्‍चित करण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...