‘यंदा पावसानं सारी पिकं संपवली’

‘यंदा पावसानं सारी पिकं संपवली’
‘यंदा पावसानं सारी पिकं संपवली’

बीड : ‘‘एकत्र कुटुंबात म्हणायला ६० ते ७० एकर शेती; पण यंदा पावसानं सारी पिकं संपवली. कापूस, बाजरी, सोयाबीन ही पिकं हातची गेली, काही तर सोंगायची गरज पडली नाही. जनावरांना खायला चारा नाही. चारा पिकं सततच्या पावसानं सडून गेली. हिरवी कपाशी उपटून जनावरांना खाऊ घालतोय,’’ गेवराई तालुक्यातील आम्ला येथील अरुणाबाई महादेव चव्हाण मन सुन्न करणाऱ्या व्यथा केंद्रीय पथकासमोर मांडत होत्या.

केंद्रीय पथक शनिवारी (ता. २३) बीड जिल्ह्यात दाखल झाले. गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथील लक्ष्मीकांत कुलथे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी करत पथकाने आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. १० हजार खर्चून २ एकर मक्त्याने शेती करणाऱ्या धोंडराई शिवारातील प्रल्हाद केदार यान यांच्या पदरात त्या दोन एकरांतून कुजक्या बाजरीच्या दोन गोण्या पडल्या.

बाजरीचे सरमाड चारा म्हणून उपयोगात येण्याजोगे राहिले नाही. विभागीय आयुक्तांनी त्यांना ते पेटवून न देता खत करण्याचा दिलेला सल्ला त्यांनी मान्य केला. धोंडेराईच्याच छाया पुदेकर, बाग पिंपळगावचे विलास कोटंबे, रांजनी शिवारातील कुंडलिक जाधव, जळगाव मजरा शिवारातील दामोदर इदगे यांच्या शिवारांत पथकाने भेटी दिल्या. आम्ला येथील अरुणाबाई चव्हाण, माजलगाव तालुक्यातील शिवाजी रांजवन, प्रणिता रेवनवार, लहाली वाडी येथील सलाउद्दीन ख्वाजा मिया, तेलगाव (ता. धारूर) शिवारातील जयप्रकाश तोष्णीवाल, पुसरा (ता. वडवणी) येथील सोनाबाई वावळ, मोरवड येथील माउली शेळके यांच्याशी पथकाने संवाद साधला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com