Agriculture news in Marathi All the dams in Pune district have been breached | Agrowon

पुणे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंब

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली असून एकूण २१३.१३ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यामध्ये उजनी धरणाचाही समावेश आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

पुणे ः चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली असून एकूण २१३.१३ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यामध्ये उजनी धरणाचाही समावेश आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

यंदा एक जून रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला होता. परंतु जून व जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने धरणातील पाणी पातळी फारशी वाढलेली नव्हती. त्यामुळे पाणी टंचाई भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, जून, जुलैमध्ये पाऊस कमी झाला असला तरी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दमदार पाऊस झाला. साधारणपणे तीन ऑगस्टपासून जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात चांगलाच जोर होता. त्यातच परतीच्या पावसानेही ऑक्टोबरमध्ये हजेरी लावली. त्यामुळे जवळपास सर्वच धरणांतून कमीअधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता.

गेल्या वर्षी याच काळात या सर्व धरणांत २१३.९१ टीएमसी पाणीसाठा होता. यंदाही गेल्या वर्षी एवढीच वाढ झाल्याचे दिसून येते. यंदा उशिराने झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. यामुळे आगामी काळात पाणी टंचाई भासण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.

सध्या वरसगाव, पानशेत, पवना, टेमघर, कासारसाई, मुळशी, कळमोडी, आंध्रा, शेटफळ, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर, नाझरे, डिंभे, उजनी अशी सर्वच धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे भाटघर, नीरा देवघर, वीर, नाझरे, डिंभे, घोड, उजनी, खडकवासला, कासारसाई, कळमोडी, चासकमान, आंध्रा, उजनी या धरणांतून पाण्याचा विसर्ग कालवा आणि नदीमध्ये सोडण्यात आला होता. यामुळे कानंदी, कऱ्हा, घोड, भीमा, मुठा, पवना, आरळा, इंद्रायणी नद्या पाण्याने दुथडी भरून वाहत होत्या.

एक जूनपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः टेमघर ३०८९, वसरगाव २३३९, पानशेत २४५३, खडकवासला १३८३, पवना १८५४, कासारसाई १२८२, मुळशी ३१७९, कळमोडी १११५, चासकमान ९१०, भामा आसखेड १०३३, आंध्रा १२१५, वडीवळे २३२२, गुंजवणी २३६०, भाटघर ११०८, निरा देवघर २१३९, वीर ७३१, नाझरे ८२८, पिंपळगाव जोगे ७८७, माणिकडोह ७७३, येडगाव १०६९, वडज ५७९, डिंभे १०९०, चिल्हेवाडी ९०९, घोड ६५६, विसापूर ५१३, उजनी १०११.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...