Agriculture news in marathi All day in Kolhapur district The presence of continuous rain | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार पावासाची हजेरी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच राहिला. बुधवारी (ता.३) पहाटेपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसास सुरुवात झाली.

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच राहिला. बुधवारी (ता.३) पहाटेपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसास सुरुवात झाली. थोड्याशा विश्रांतीनंतर अधून-मधून संततधार पाऊस येतच राहिला. निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावाने जिल्ह्यात सर्वच ठिकाणी संततधार पाऊस सुरू होता. 

जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत करवीर तालुक्यात सर्वाधिक ९८.३६ मिमी, तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी १०.१४ मिमी पावसाची नोंद झाली. गगनबावडा शाहूवाडी राधानगरी तालुक्यात ५० मि.मी हून अधिक पाऊस झाला. जिल्ह्यातील राधानगरी धरणात ३९ दलघमी पाणीसाठा आहे. सकाळी ७ च्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

सतत पडणाऱ्या पावसामुळे पेरणीसाठी अतिशय चांगले वातावरण झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. पश्चिम भागात जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के धुळवाफ पेरण्या आटोपल्या आहेत. अनेक शेतकरी संततधार पावसात ही पेरण्या करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस असल्याने याचा फायदा येणाऱ्या खरीप हंगामास चांगल्या प्रमाणात होईल, अशी शक्यता कृषी विभाग व शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 
 


इतर बातम्या
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...