राधानगरीचे सर्व दरवाजे बंद; नद्यांच्या पाण्यात घट

जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांचे पाणी पूर्ववत होत आहे. राधानगरी धरणातून होणारा विसर्ग कमी झाला. रविवारी (ता. २३) धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले. विद्युत पायथा गृहातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
All the doors of Radhanagari closed; Decrease in river water
All the doors of Radhanagari closed; Decrease in river water

कोल्हापूर : जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांचे पाणी पूर्ववत होत आहे. राधानगरी धरणातून होणारा विसर्ग कमी झाला. रविवारी (ता. २३) धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले. विद्युत पायथा गृहातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही घट कायम आहे. रविवारी दुपारी १२ वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ ३४ फूट इतकी होती. पाण्याखालील बंधारे ३१ आहेत. कोयना व वारणा धरणांतून शुक्रवारी पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात वाढवला होता. पण त्याचा विशेष परिणाम नद्यांच्या पाणी पातळीवर झाला नाही. पाऊस थांबल्याने इतर स्रोतातून नद्यांत पाणी येणे बंद असल्याने नद्यांचे पाणी कमी होत असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. तरी ही हवमानाचा अंदाज घेऊन आम्ही पाणी कमी जास्त प्रमाणात सोडत आहोत, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील धरणांचा विसर्ग
तुळशी ५०७
वारणा ७७२६
दूधगंगा १८००
कासारी २५०
कडवी ८६५
कुंभी ३५०
पाटगाव २३९३
चित्री ८२५
जंगमहट्टी ३३५
घटप्रभा ९२३
जांबरे १०७०
कोदे ल.पा. ४९६
जिल्ह्याबाहेरील धरणांचा विसर्ग
कोयना २७८७१
अलमटी २०००००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com