Agriculture news in marathi All farmers are eligible for loan waiver on lakhs | Agrowon

सव्वादोन लाखांवर शेतकरी कर्जामाफीसाठी पात्र

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

परभणी  ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील २ लाख २३ हजार ६४७ शेतकऱ्यांची कर्जखाती कर्जमाफीसाठी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना १ हजार २७८ कोटी ६२ लाख ६३ हजार ६०१ रुपये एवढ्या रकमेची कर्जमाफी मिळणार आहे.या बाबत जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाच्या सूत्रांनी माहिती दिली.

परभणी  ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील २ लाख २३ हजार ६४७ शेतकऱ्यांची कर्जखाती कर्जमाफीसाठी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना १ हजार २७८ कोटी ६२ लाख ६३ हजार ६०१ रुपये एवढ्या रकमेची कर्जमाफी मिळणार आहे.या बाबत जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाच्या सूत्रांनी माहिती दिली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २१ बॅंकाअंतर्गतचे २ लाख २३ हजार ६४७ शेतकरी कर्जदार पात्र आहेत. सर्व बॅंकांची मिळून कर्जमाफीची रक्कम १ हजार २७८ कोटी ६२ लाख ६३ हजार ६०१ रुपये एवढी आहे. कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी खातेदारांना कर्जखात्याशी आधारकार्ड क्रमांक संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पात्र शेतकरी खातेदारांपैकी २ लाख ११ हजार ५६६ शेतकऱ्यांची (९४.६ टक्के) कर्जखाती आधार क्रमांकाशी संलग्न आहेत. अद्याप १२ हजार ८१ कर्जखाती आधार क्रमांकांशी जोडलेली नाहीत. पात्र शेतकऱ्यांपैकी १ लाख ८५ हजार ६२७ शेतकऱ्यांची (८७.७४ टक्के) माहिती कर्जमाफीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भारतीय स्टेट बॅंकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी संख्या सर्वाधिक १ लाख ६ हजार ९२९ एवढी आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ४४ हजार ३६६ शेतकऱ्यांना तर महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या ३५ हजार १५८ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. अॅक्सिस बॅंकेचे सर्वात कमी ६४ शेतकरी लाभार्थी असून त्यांना १ कोटी ४५ लाख ८३ हजार २८१ रुपयाचे कर्जमाफी मिळणार आहे. एचडीएफसी बॅंकेची कर्जामाफीची रक्कम सर्वात कमी ४१ लाख रुपये एवढी आहे. कर्जमाफीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी शुक्रवार (ता. २१) पर्यंत प्रसिध्द केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.


इतर बातम्या
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
पदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
केळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...
अकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...
‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...
धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाहीच ः...अकोला ः ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर...
फूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...
नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...
मराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...
माळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...
आरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...
अमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...