रत्नागिरीतील पाचही जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार
रत्नागिरीतील पाचही जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार

रत्नागिरीतील पाचही जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार

रत्नागिरी : शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यात जिल्ह्यातील पाचही जागांवर शिवसेना उमेदवार उभे करणार आहे. दापोलीतून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश, तर चिपळूणातून सदानंद चव्हाण, गुहागरमधून भास्कर जाधव, राजापुरातून राजन साळवी, तर रत्नागिरीतून उदय सामंत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मही देण्यात आले आहेत.

दापोली विधानसभा मतदारसंघावर शिवसेना व भाजप या दोघांनीही दावा केला होता. शिवसेनेतून योगेश कदम, संदीप राजपुरे व सुनील भागणे हे तीन जण इच्छुक होते. या तिघांनीही उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखत दिली. कुणबी उमेदवार द्यावा, अशी मागणी कुणबी समाजातर्फे करण्यात आली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दापोलीतून योगेश कदम यांच्या नावाची घोषणा केली. ए. बी. फॉर्मही दिला. 

शिवसेनेकडून विद्यमान आमदारांना तिकीट देण्यावर पूर्वीच निर्णय घेतला होता; मात्र गुहागरचे आमदार जाधव यांनी शिवसेना प्रवेश केल्यानंतर ते चिपळूणमधून उभे राहतील की काय अशी शक्यता वर्तविली होती. पण ती मावळली असून आमदार चव्हाण यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राजापूर तालुक्यात विरोधी गटाकडून साळवी यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

या घडामोडींमुळे राजापुरातील उमेदवारीकडे लक्ष लागले होते. पण, विरोधी गटापेक्षा समर्थक गटाने सह्यांचे पत्र वरिष्ठांकडे पाठविले होते. रविवारी (ता. २९) घटस्थापनच्या मुहूर्तावर साळवी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत ए. बी. फार्मही दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com