नाशिकमध्ये सर्वदूर  पावसाची हजेरी 

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवीक पावसाने जिल्ह्याच्या पूर्व भागाला पावसाने चांगलेच झोडपले आहे. नांदगाव, मालेगाव व येवला तालुक्यांतील पिकांना मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे.
नाशिकमध्ये सर्वदूर  पावसाची हजेरी  All over Nashik The presence of rain
नाशिकमध्ये सर्वदूर  पावसाची हजेरी  All over Nashik The presence of rain

नाशिक : हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवीक पावसाने जिल्ह्याच्या पूर्व भागाला पावसाने चांगलेच झोडपले आहे. नांदगाव, मालेगाव व येवला तालुक्यांतील पिकांना मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. सोमवारी (ता. २७) दुपारी चार वाजल्यानंतर पावसाचा वाढलेला जोर मंगळवारपर्यंत (ता.२८) कायम दिसून आला. कळवण व सुरगाणा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला.  पावसाने मालेगाव, बागलाण, कळवण, सुरगाणा, येवला, चांदवड व देवळा तालुक्यांत पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी बाजरी सोयाबीन या पिकांच्या पूर्वभागात जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. नांदगाव, मालेगाव व येवला तालुक्यांत चालू महिन्यात खरीप पोळ कांदा पिकाला पावसाचा फटका बसला आहे. अनेक नव्या लागवडीत पाणी साचून राहिल्याने रोपांची मोठ्या प्रमाणावर मर होत आहे. त्यामुळे काही भागांत दुबार लागवड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  कसमादे भागातील देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यांत द्राक्ष बागेत बहर छाटण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र फुलोऱ्यात असलेल्या बागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरअखेर होणाऱ्या चांदवड, निफाड, दिंडोरी येथील छाटणीची कामे या पावसामुळे तूर्तास बंद झाले आहेत. अनेक भागांत भावात घसरण झाल्यानंतरही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडी जिवंत ठेवल्या होत्या. मात्र या पावसामुळे लागवडीचे नुकसान होत आहे.  कळवण तालुक्यात सलग दोन दिवसांपासून जोरात पाऊस चालू आहे. येथील मका पिकासाठी तो चांगला असल्याचे सांगितले जात आहे. नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा होती, मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसामुळे द्राक्ष बागेत अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बागेतून पाणी काढावे लागत आहे. इगतपुरी, पेठ व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात मंगळवारी (ता.२८) रोजी सकाळपासून पावसाने हजेरी लावल्यानंतर उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. सिन्नर तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही तालुक्यातील भोजापूर धरण भरले नसल्याने शेतकऱ्यांनी येत्या हंगामात भीती व्यक्त केले आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.      गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला  जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानंतर गंगापूर धरणातून ३४२६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दारणातून ५५०, तर नांदूरमध्यमेश्‍वरमधून ७९०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. 

जिल्ह्यात झालेला पाऊस  तालुका...मिमी  मालेगाव...३४.४  बागलाण...२५  कळवण...४४  नांदगाव...५१.३  सुरगाणा...३७.६  नाशिक...६.५  दिंडोरी...२०.४  इगतपुरी...५  पेठ...१२.९  निफाड...१८.३  सिन्नर...१२.८  येवला...२४.७  चांदवड...२६.२  त्र्यंबकेश्‍वर...३.५  देवळा...३४.९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com