मराठवाड्यात सर्वदूर रिमझिम

औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत सर्वदूर रिमझिम
औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत सर्वदूर रिमझिम

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यांत बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत रिमझिम पाऊस झाला. मध्येच सरींचा जोर पाहायला मिळाला. या पाचही जिल्ह्यांतील ३८ मंडळांत २० ते ३३ मिलिमीटरदरम्यान पावसाची नोंद सर्वाधिक ठरली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांत सर्वदूर पावसाची नोंद झाली. १४ मंडळांत २० ते २७ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. कांचनवाडी मंडळात २७, उस्मानपुरा २७, औरंगाबाद २०, भावसिंगपुरा २५, करमाड २३, चिकलठाणा २१, फुलंब्री २५, पिरबावडा २०, अंबाई २०, सोयगाव २०, लासूरगाव २४, तुर्काबाद २०, चापानेर २०, तर  वेरूळ मंडळात २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

जालना जिल्ह्यातील ४९ मंडळांतही रिमझिम पाऊस झाला. यापैकी १६ मंडळांत २० ते ३३ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. मंठा तालुक्‍यातील ढोकसाल मंडळात सर्वाधिक ३३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ तळणी ३०, मंठा २६, रांजणी २१, जालना २८, रामनगर २०, पाचनवडगाव २३, वाग्रूळ जहागीर ३०, बदनापूर २३, दाभाडी २५, सेलगाव २२, पिंपळगाव रेणूकाई २२, राजूर २५, जाफराबाद २३, टेंभुर्णी २४, कुंभारझरी २०, तर रांजणीत २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडळांत तुरळक, हलका पाऊस झाला. १ ते १८ मिलिमीटर दरम्यान सर्वदूर पाऊस झाल्याची नोंद झाली. लातूर जिल्ह्यातही सर्व ३९ मंडळांत पावसाची हजेरी तुरळक ते हलकी राहिली. जळकोट मंडळात २५ मिलिमीटर, अहमदपूर २३, शिरूर ताजबंद २२, हाडोळती २१ याच मंडळात इतर मंडळांपेक्षा थोडा जास्त पाऊस झाला. 

उस्मानाबादमध्ये हलक्या सरी

उस्मानाबाद जिल्ह्यातही सर्वच मंडळांत रिमझिम झाली. १ ते २२ मिलिमीटर दरम्यान पाऊस सर्व मंडळात नोंदला गेला. त्यामध्ये सालगरा २२ मिलिमीटर, ढोकी २०, पाडोळी २०, तर तुळजापूर मंडळात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित मंडळांमध्ये १ ते १९ मिलिमीटरदरम्यान पाऊस झाल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com