agriculture news in marathi, All the ponds of the Sangli district came to an end | Page 2 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यातील सर्वच तलाव आटले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

सांगली ः ताकारी, टेंभू, आरफळ योजनेच्या पाण्यामुळे कालव्याशेजारील गावांना, क्षेत्राला दिलासा मिळाला. मात्र, बहुसंख्य क्षेत्र कालव्याच्या टप्प्यात नाही. तिथे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील गावे तर केवळ पाणीपट्टी भरली नसल्याने कोरडी राहिली आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी नुकतेच सुरू झाले. हे पाणी अतिशय संथ आहे. पाणीपट्टीअभावी कालव्यातून उपसा बंद आहे. छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना पाणी मिळेना. तलाव आटले आहेत. विहिरींच्या पाण्याने केव्हाच तळ गाठला आहे.

सांगली ः ताकारी, टेंभू, आरफळ योजनेच्या पाण्यामुळे कालव्याशेजारील गावांना, क्षेत्राला दिलासा मिळाला. मात्र, बहुसंख्य क्षेत्र कालव्याच्या टप्प्यात नाही. तिथे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील गावे तर केवळ पाणीपट्टी भरली नसल्याने कोरडी राहिली आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी नुकतेच सुरू झाले. हे पाणी अतिशय संथ आहे. पाणीपट्टीअभावी कालव्यातून उपसा बंद आहे. छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना पाणी मिळेना. तलाव आटले आहेत. विहिरींच्या पाण्याने केव्हाच तळ गाठला आहे.

गावे तहानली, टॅंकर मिळेना
जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्‍यांत दुष्काळाने कहर केला आहे. खरीप वाया गेला. रब्बीची तर पेरणीच झालेली नाही. डाळिंब, द्राक्षबागा तहानेने व्याकूळ झाल्या आहेत. तालुक्‍यातील २१ गावांचे टॅंकर मागणीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पडून आहेत. एकही प्रस्ताव मंजूर झाला नाही. अन्य गावे, वाड्यांची टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. आटपाडी तालुक्‍यातूनही १२ गावांचे टॅंकरचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. २५ गावात विहिरी, बोअर अधिग्रहण केल्या आहेत. २ गावातील विहिरी, बोअरचे पाणी संपले आहे. टेंभू च्यालाभक्षेत्रातील ठराविक गावे सोडली तर अन्य बहुसंख्य गावांमध्ये टेंभू योजनेचे पाणी नाही आणि पावसाचेही नाही, अशी स्थिती आहे.

अत्यल्प पावसाने सिंचन योजनांना मर्यादा
थोडा दिलासा मिळाला आहे. उर्वरित तालुका दुष्काळाने होरपळू लागला आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी गव्हाणपर्यंतच आले असून पूर्वभागात अजून हे पाणी पोहोचले नाही. तासगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातही पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. उपसासिंचन योजनांचे पाणी कालव्याशेजारील क्षेत्रापुरते मर्यादित राहिले आहे. तालुक्‍यात पाऊस अत्यल्प झाल्याने सिंचन योजनांच्या पाण्याला मर्यादा आल्या आहेत. म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या नियोजनाचा अभाव, पाणीपट्टी न भरण्याचा मोठा फटका मिरज पूर्वभागाला बसला आहे.  पाणी मागणीचे अर्ज नसल्याने पाणी मिळेना झाले आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाची भयानता वाढत आहे. टंचाई निवारण उपाययोजना राबविणे आवश्‍यक आहे.

लोकप्रतिनिधी आणि विरोधकही थंड
जिल्ह्याच्या पूर्वभागात दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. लोक त्रस्त झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचे टॅंकरही मिळेना झाले आहेत. प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींची कोंडी झाली आहे. विरोधी पक्षही थंड आहेत. विरोधकांकडूनही उठाव होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलननगर  ः गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर...
नांदेडमध्ये दूध दरप्रश्नी एल्गारनांदेड : रयत क्रांती संघटनेतर्फे शनिवारी (ता...
सांगलीत दूध रस्त्यावर ओतून, सरकारचा...सांगली  : ‘सरकारची माया आटली, दूध...
काटेपूर्णा प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठाअकोला  : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक...
महायुतीचे वऱ्हाडात दूध दरप्रश्नी आंदोलनअकोला  ः दूध उत्पादकांनासरसकट १० रुपये...
दूध दरप्रश्नी कोल्हापुरात भाजपचा ‘...कोल्हापूर  : दुधाला प्रतिलिटर १० रुपये तर...
दूध दरप्रश्नी महायुतीचे नाशिक जिल्ह्यात...नाशिक  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दूध...
रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
पुणे विभागीय आयुक्तपदाची सूत्रे सौरभ...पुणे: पुणे विभागीय आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी...
गुणनियंत्रण संचालकपदी दिलीप झेंडेपुणे: राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदी...
राज्य सरकारने कांदा उत्पादकांना अनुदान...नाशिक  : कांदा हे पीक दरवर्षी कोणत्या ना...
सोलापूर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलन सोलापूर  ः दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या एल्गार...
दोन बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन...अकोला ः या हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने...
शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर धडकेल...नगर  ः महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व...
... तर आम्ही मोठे आंदोलन करू ः...पुणे  ः राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर...
राज्यामध्ये येत्या काळात चांगल्या...कोकण, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्व...
डाळिंबावरील तेलकट डाग, मर, बुरशीजन्य...नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीकनांदेड : ‘‘कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी...
नांदेड जिल्ह्या अखेरच्या दिवशी...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत पीक...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...