Agriculture news in Marathi, In all the schemes of the government, Satara district is at the top: Shweta Singhal | Agrowon

शासनाच्या सर्व योजनांत सातारा जिल्हा अव्वल ः श्‍वेता सिंघल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

सातारा ः जिल्ह्यात महसूल विभागातील सर्वच अधिकारी, कर्मचारी क्षमतापूर्ण असल्यामुळेच शासनाची कोणतीही योजना आली तरी त्यात सातारा अव्वल क्रमांकावर राहिला आहे, असे गौरवोद्‌गार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी काढले. 

सातारा ः जिल्ह्यात महसूल विभागातील सर्वच अधिकारी, कर्मचारी क्षमतापूर्ण असल्यामुळेच शासनाची कोणतीही योजना आली तरी त्यात सातारा अव्वल क्रमांकावर राहिला आहे, असे गौरवोद्‌गार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी काढले. 

कऱ्हाड उपविभागातर्फे येथे आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, महसूल उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाकारी पूनम मेहता, कीर्ती नलावडे आदींसह सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नेटक्‍या नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी सिंघल यांनी प्रांताधिकारी खराडे व तहसीलदार वाकडे यांचे कौतुक केले. पुढच्या वर्षी महसूल दिनाची जबाबदारी वाई उपविभागाकडे असल्याचेही श्रीमती सिंघल यांनी या वेळी जाहीर केले. 

गुढीपाडव्यालाही तलाठ्यांनी सुटी न घेता केलेले कामामुळेच जिल्हा अनेक कामांत अव्वल आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीतही चार टक्के मतदान वाढले, नवमतदारांची नावनोंदणी वाढली आहे. महसूल वसुलीतही अव्वल राहिल्याने काम चांगले झाले आहे. महसूल वसुलीत साहेबराव गायकवाड यांनी मेहनत घेतली. निवडणूक व दुष्काळात सर्वांनीच चांगले काम केले. माण, खटाव, फलटण, कोरेगावच्या प्रांत, तहसीलदारांनी उल्लेखनीय काम केले. 

अप्पर जिल्हाधिकारी श्री. गायकवाड, फलटणचे तहसीलदार हणमंत पाटील, चंद्रकांत पारवे, सागर कारंडे यांची भाषणे झाली. या वेळी महसूलमधील उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी स्वागत केले. श्री. जानुगडे यांनी सूत्रसंचालन केले. 
 

इतर ताज्या घडामोडी
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...