सातारा जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी योगदान द्यावे ः पालकमंत्री पाटील

All should contribute to the development of the district: Guardian Minister Patil
All should contribute to the development of the district: Guardian Minister Patil

सातारा  : चालू आर्थिक वर्षात विविध कारणांमुळे जिल्हा वार्षिक योजनांचा निधी कमी प्रमाणात खर्च झाला आहे. जिल्ह्याची विकासकामे वेळेत करून हा निधी मार्चपूर्वी खर्च करण्यासाठी प्रशासनासह सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीची सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजनांची प्रारूप आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राज्याचे सहकार, पणन मंत्री तथा पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. 

यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, दीपक चव्हाण, महेश शिंदे, मोहनराव कदम, आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे आदी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हा नियोजन समिती मागील बैठकीतील इतिवृत्त व त्यावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालन अहवालास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनु. जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्रबाह्य उपयोजना) २०१९-२० अंतर्गत ३१ डिसेंबरअखेर झालेल्या  खर्चाचा आढावा घेऊन पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या पुनर्विनियोजन प्रस्तावामध्ये सर्वसाधारण योजनेखालील ८३४.६४ लक्ष अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाखालील रु. ६९०.४४ लक्ष व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्राखालील १५८.२१ लाख मार्च २०२० अखेर खर्च होऊ न शकणारी संबंधित योजनांवरील तरतूद इतर योजनांकडे वळवण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्‍हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनाबाह्यक्षेत्र) सन २०२०-२१ च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या २६४.४९ कोटी रकमेच्या मर्यादेव्यतिरिक्त ६०.५१ कोटींच्या वाढीव मागणीसह एकूण ३२५ कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

पत्रकारांना मज्जाव  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना बसण्यास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मज्जाव केला. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना त्यांनी पहिली बैठक असल्याने समजून घ्या, असे सांगितले. पत्रकारांची समजूत काढण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी बैठकीतून बाहेर येत  मध्यस्थाची भूमिका बजावली. यापूर्वीचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही त्यांच्या काळात झालेल्या नियोजन समितीच्या बैठकांना पत्रकारांना मज्जाव केला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com