सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्प

All transactions with onion in Solapur are jammed
All transactions with onion in Solapur are jammed

सोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोधासाठी वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदमुळे सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता.२४) भाजीपाला वगळता अन्य सर्व व्यवहार बंद राहिले. त्यात सर्वाधिक कांदा लिलावाला फटका बसला. त्यामुळे सुमारे १२ कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाली. 

बाजार समितीच्या आवारात भुसार, भाजीपाला- कांदा आणि फळांचे रोजच्या रोज व्यवहार होतात. शिवाय बाजार समितीच्या आवारात रोज सकाळपासूनच लिलावाची गडबड सुरु असते. पण शुक्रवारी भाजीपाला विभागात काहीसे व्यवहार झाले. त्यात भाज्या व फळभाज्यांची आवक तशी कमीच राहिली. त्यामुळे हे व्यवहार अवघ्या तास-दोन तासातच आटोपले. पण दुपारनंतर होणारे कांदा आणि भुसारचे सर्व व्यवहार बंद राहिले. शिवाय कांद्यासह अन्य शेतमालाची आवकही तुलनेने कमीच राहिली. बंदचा हा परिणाम बाजार समितीच्या आवारातही जाणवला. 

सोलापूरसह पुणे, उस्मानाबाद, लातूर भागातून शेतमालाची आवक बाजारात होते. पण आज ही आवक तुलनेने कमीच होती. दिवसभर बाजार समितीच्या आवारात सर्वत्र शुकशुकाट राहिला. केवळ काही मोजक्‍या व्यापाऱ्यांकडे वाहनांमधून माल उतरणे आणि बाहेर पाठवणे, असे चित्र होते. प्रत्यक्षात लिलाव मात्र होऊ शकले नाहीत. 

कांद्याच्या लिलावाला फटका

बाजार समितीच्या आवारात सध्या कांद्याचा हंगाम सुरु आहे. कांदा विभागाची दिवसाची सर्वाधिक उलाढाल ११ कोटीहून अधिक आहे. भाजीपाल्याची ९० लाख आणि भुसारची सहा लाखाच्याही पुढे आहे. या बंदमुळे जवळपास १२ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प राहिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com