सातारा जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांवर

सातारा जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांवर
सातारा जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांवर

सातारा : दुष्काळी परिस्थितीत नुकसानभरपाई मिळवून देण्यात अत्यंत महत्त्वाचे कारण असते ती खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत पैसेवारी राहिल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास मदत होते. यंदा मात्र, जिल्हाभरात अतिपावसाने पैसेवारीही वाढली आहे. सर्वच महसुली गावे, पालिका, पंचायतींमध्ये ५० पैशांच्या वर पैसेवारी गेली आहे. 

प्रशासनाने जाहीर केलेल्या पैसेवारीवरून दुष्काळ जाहीर केले जातात. जर, ५० पैशांच्या आत ही पैसेवारी असली तर दुष्काळ समजला जातो. गत पावसाळ्यात मात्र सातारा जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले आहे. पावसाने ‘अति’च केल्याने त्याचा फटका प्राधान्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला. 

महापूर, पूर, अतिपावसामुळे जिल्ह्यातील रस्ते, विकासकामे, जलसंधारणाच्या कामांचेही प्रचंड नुकसान झाले. तसेच व्यावसायिकदृष्ट्याही खूप नुकसान झाले. या पावसामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला. काही वर्षे जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती होती. पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पैसेवारीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पैसेवारी काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक गावात एक समिती तयार करण्यात येते. ही समिती गावातील हलकी, मध्यम व चांगली अशा प्रकारच्या शेतीची निवड करते. त्यानंतर ही समिती निवडलेल्या शेतीतील लावलेल्या पिकाची वाढ, पावसाचे प्रमाण, जमिनीचा प्रकार याची नोंद घेतात. नोंदी घेताना शेतातील प्रमुख पिकांची यात निवड केली जाते. 

पैसेवारी जाहीर करण्यासाठी गावातील काही जमिनी निवडून त्यातील पिकांची पाहणी केली जाते यात पिकांची वाढ, पावसाचे प्रमाण, जमिनीचा प्रकार याची नोंद घेऊन निघालेल्या पिकाचा वजन करून अंदाज बांधला जातो. आलेल्या अंदाज वरून पैसेवारी जाहीर करण्यात येते. त्यानंतर पहिल्यांदा पैसेवारी जाहीर केली जाते. त्यावर आक्षेप मागवले जातात जर नागरिकांनी यावर आक्षेप घेतला तर ही समिती गावात जाऊन पुन्हा वरीलप्रमाणे पाहणी करते आणि त्यानंतर अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. खरीप पिकांची पैसेवारी १५ डिसेंबरच्या आत जाहीर केली जाते. महसूल प्रशासनाने ही पैसेवारी जाहीर केली असून, सर्वच गावांमध्ये ५० पैशांच्या वर पैसेवारी गेली आहे. त्यावरून जिल्ह्यात सुका नव्हे, तर ओला दुष्काळसारखी परिस्थिती असल्याचे प्रथमच समोर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com