agriculture news in marathi Allegation of asking percentage by Solapur Zillha Parishad president | Page 2 ||| Agrowon

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर टक्केवारी मागितल्याचा आरोप

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021

नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य उपकेंद्राच्या ६५ लाखांच्या वर्कऑर्डरला कार्योत्तर मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी टक्केवारी मागितल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसवंर्धन समितीचे सभापती अनिल मोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य उपकेंद्राच्या ६५ लाखांच्या वर्कऑर्डरला कार्योत्तर मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी टक्केवारी मागितल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसवंर्धन समितीचे सभापती अनिल मोटे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यावर मोटे यांनी केलेले आरोप खोटे, दिशाभूल करणारे आणि नैराश्यातून केले असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेतील या दोन पदाधिकाऱ्यांतील वाद चव्हाट्यावर आल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.

श्री. मोटे म्हणाले, ‘‘एकूण तीन उपकेंद्रांच्या बांधकामाची कार्योत्तर मंजुरी होती. त्यापैकी दोन कामांचे ठेकेदार त्यांना भेटल्यानंतर सह्या केल्या. पण माझ्या भागातील कामासाठी ठेकेदार भेटून काम झाले नाही. एका जबाबदार सदस्याने अध्यक्षांची भेट घेतली. त्या वेळी टक्केवारीचा मुद्दा पुढे आला.’’ त्याशिवाय घेरडी ग्रामपंचायतीने व्यापारी गाळे बांधण्यासाठी दाखवलेल्या मिळकत क्रमांक २६ मध्ये एकही इंच जागा नाही.

पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेरडी ग्रामपंचायतीतर्फे बांधण्यात येणाऱ्या व्यापारी गाळ्यास २९ लाख ५५ हजार रुपयांच्या कर्जमंजुरीचा विषय चर्चेसाठी आला होता. त्यावेळी मी स्वत: घेरडीचा रहिवासी आहे, व्यापारी गाळे बांधकामाचा प्रस्ताव परिपूर्ण नसून जागा उपलब्ध नाही, असे सांगितले. तरीही हा विषय येतो आणि त्यावर कार्यवाही होते, याचा अर्थ काय, असाही प्रश्‍न मोटे यांनी उपस्थित केला आहे. 

प्रतिक्रिया...
सभापती मोटे यांचे सगळे आरोप खोटे, दिशाभूल करणारे आणि नैराश्यातून केलेले आहेत. सांगोला तालुक्यातील त्यांच्या राजकीय भांडणात त्यांनी मला ओढले आहे. जिल्हा परिषदेसह माझी बदनामी केली आहे. आतापर्यंत मी प्रामाणिकपणे काम केले. कोणाचीही तक्रार नाही. त्यांनी भक्कम पुरावे द्यावेत, मीही दाखवून देतो.
- अनिरुद्ध कांबळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, सोलापूर


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...