agriculture news in Marathi alli rani says mills free to purchase cotton from open market Maharashtra | Agrowon

कापड गिरण्या बाजारातून कापूस खरेदीस मोकळ्या: अली राणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 जानेवारी 2020

‘सीसीआय’ कापसाची साठेबाजी करीत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. खरेदी केलेल्या कापसाचा दर हा गुणवत्तेवर अवलंबून आहे. तसेच, आम्ही खरेदीनुसार दरात सूट देत आहोत. परंतु, आम्ही उच्च दर्जाचा कापूस बाजारभावाप्रमाणे देऊ शकत नाही. 
- अली राणी, अध्यक्षा, ‘सीसीआय’

मुंबई ः साउथ इंडियन मिल्स असोसिएशनने केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून ‘‘सीसीआय’ कापसाची साठेबाजी करून जास्त दराने विक्री करीत आहे,’’ अशी तक्रार केली होती. यावर, ‘‘असोसिएशनने सांगितलेल्या कमी दराने खुल्या बाजारातून कापूस खरेदीस कापड गिरण्या मोकळ्या आहेत,’’ असे प्रत्युत्तर ‘सीसीआय’च्या अध्यक्षा अली राणी यांनी असोसिएशनला दिले.

‘‘सीसीआय’ कापसाची साठेबाजी करून बाजारभावापेक्षा अधिक दराने कापड गिरण्यांना विक्री करत आहे. ‘सीसीआय’ने कापसाचे दर बाजारभावाएवढे ठेवावे जेणेकरून गिरण्यांची स्पर्धाक्षमता वाढेल,’’ अशी मागणी साऊथ इंडियन मिल्स असोसिएशनने अलीकडेच केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली होती.

यावर ‘सीसीआय’च्या अध्यक्षा अली राणी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, ‘‘यंदाच्या हंगामात झालेल्या आवकेपैकी केवळ २५ टक्के कापूस खरेदी ‘सीसीआय’ने केली आहे. सूत गिरण्यांना आमचा दर जास्त वाटत असल्यास खुल्या बाजारातून थेट शेतकऱ्यांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी का करत नाहीत.’’

चालू कापूस हंगामात ‘सीसीआय’ने हमीभावाने ४० लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे. ‘सीसीआय’ने रुपईच्या स्वरूपात प्रतिखंडीला (१खंडी=३५६ किलो रुई) ४३ हजार रुपये हमीभाव दिला. तर, ‘सीसीआय’चा विक्री दर जवळपास प्रतिखंडी ४६ हजार रुपये आहे. त्यामुळे ‘‘शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यामागच्या उद्देशाविरोधी भूमिका ‘सीसीआय’ घेत आहे,’’ असा आरोप असोसिएशनने केला. 

‘‘सीसीआय’ हमीभावापेक्षा १ किंवा २ टक्के अधिक दर आकारू शकेत. मात्र, सध्या जवळपास १० टक्के अधिक दर आकारण्यात येत आहे. हे कापड गिरण्यांसाठी परवडणारे नाही,’’ असे असोसिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

देशात यंदा किमान ३५० लाख गाठी कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी ३१२ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. 

ग्रेडनुसार दर ः ‘सीसीआय’
यंदाही जागतिक कापूसपुरवठा वाढला आहे. परंतु, वापर काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे कापसाचे दर नियंत्रणात आहेत. भारतात अनेक बाजारांत किमान हमीभावावर कापूस उपलब्ध आहे. परंतु, उच्च दर्जाच्या कापसाचे दर जास्त आहेत. मागील वर्षीसुध्दा ‘सीसीआय’ने कापसाचे दर जास्त जाहीर केले होते. ‘सीसीआय’ने म्हटले आहे, ‘‘आम्ही उच्च दर्जाचा कापूस विक्री करीत आहोत. कापसाचे दर हे ग्रेडनुसार आहेत.’’ आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर कमी झाल्यास कापड गिरण्या त्यांची गरज आयात करून भागवतील.

प्रतिक्रिया
‘सीसीआय’चे उद्दिष्ट हे कापूस दरातील चढउतार नियंत्रित करणे आणि कापड गिरण्यांना योग्य दरात कापूस उपलब्ध करून देणे आहे. ‘सीसीआय’च्या जास्त दरामुळे जिनिंग आणि खासगी व्यापारी यांचे दरही वाढण्यास मदत होते. त्यामुळे कापड गिरण्या अडचणीत येतात.
- गुरुसामी रथाकृष्णा, अध्यक्ष, कोईंबतूर कॉटन असोसिएशन
 


इतर अॅग्रोमनी
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...
खानदेशात १२ लाख गाठी बाजारात कापसाची आवकजळगाव : कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
ब्राझील भारताकडून गव्हासह भरडधान्य...नवी दिल्ली: दोन्ही देशांच्या कृषिमंत्र्यांमध्ये...
हरभरा, सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या...खरीप पिकाच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली तरी...
खाद्यतेल आयात शुल्क कमी कराः ग्राहक...नवी दिल्ली: देशांतर्गत वाढलेले खाद्यतेलाचे...
खाद्यतेल बाजारात सटोडियांकडून खोड्याचा...पुणे : खाद्यतेलासह तेलबिया वायदे बाजारात सध्या...
नव्या बेदाण्यास १७५ रुपये दर तासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार...
कापड गिरण्या बाजारातून कापूस खरेदीस...मुंबई ः साउथ इंडियन मिल्स असोसिएशनने केंद्रीय...
देशात साखर उत्पादनात २६ टक्के घटनवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर...
साखर दराची दुहेरी पद्धत ठरवाकोल्हापूर : साखर उद्योगाला बळकटी आणण्यासाठी...
जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये...जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष...
तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा...नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता...
खान्देशची केळी निर्यातीत आघाडीकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख...