agriculture news in marathi alliance gives sanction for uddhav thackery as chief minister mumbai maharashtra | Agrowon

मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती : शरद पवार 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

मुंबई  :  मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नावावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत सहमती झाली आहे. नव्या आघाडीचे नेतृत्व उध्दव ठाकरे करणार असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी फिफ्टी - फिफ्टीचा फॉर्म्युुला निकाली निघाला आहे.
मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीनंतर श्री. पवार बोलत होते. राज्यातील नव्या आघाडीची आज (ता. २३) पत्रकार परिषद होणार आहे. 

मुंबई  :  मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नावावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत सहमती झाली आहे. नव्या आघाडीचे नेतृत्व उध्दव ठाकरे करणार असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी फिफ्टी - फिफ्टीचा फॉर्म्युुला निकाली निघाला आहे.
मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीनंतर श्री. पवार बोलत होते. राज्यातील नव्या आघाडीची आज (ता. २३) पत्रकार परिषद होणार आहे. 

राज्याचे आगामी मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जबाबदारी घ्यावी, अशी एकमुखी मागणी शिवसेना आमदारांनी शुक्रवारी केली.  राज्यात लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक पार पडली. बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी राज्यात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झाला आहे, त्यासाठी भाजपच जबाबदार असल्याचे या वेळी सांगितले. तसेच, जेव्हापासून पेच निर्माण झाला आहे, तेव्हापासून देवेंद्र फडणवीस वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोनही आला नसल्याची माहिती श्री. ठाकरे यांनी आमदारांना दिली.

बैठकीत शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत एकत्रित राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. बैठकीत सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जी चर्चा झाली, त्याबाबतची संपूर्ण माहिती आघाडीतील मित्रपक्षांना देण्यात आली असून, भाजप वगळून सरकार स्थापन व्हावे असे मित्रपक्षांनाही वाटत असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बैठकीनंतर सांगितले.  

काँग्रेसनेही पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ नेता निवडीचे अधिकार अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव घेण्यात आला. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...