दोन लाख ९५ हजार टन खतांचे आवंटन मंजूर

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांसाठी २ लाख ९५ हजार ७०० टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. या तिन्ही जिल्ह्याच्या वतीने रब्बी हंगाम २०२१-२२ साठी ४ लाख ३० हजार ९९४ टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती.
V
V

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांसाठी २ लाख ९५ हजार ७०० टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. या तिन्ही जिल्ह्याच्या वतीने रब्बी हंगाम २०२१-२२ साठी ४ लाख ३० हजार ९९४ टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती.

अतिवृष्टी व लांबलेल्या पावसामुळे यंदाच्या रब्बी हंगाम लांबणीवर पडला आहे. खरिपात अतिवृष्टीने मोठे नुकसान केल्याने शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बीवर आहेत. संकटातून वाचलेल्या सोयाबीनची कापणी व मळणी सुरू असतानाच शेतकरी रब्बी हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या कामी लागला आहे. खरीप हातचा गेल्याने रब्बीत ज्वारी, हरभरा, मका, गहू आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. 

कृषी विभागाकडून औरंगाबाद जिल्ह्यासाठी १ लाख ८६ हजार टन, जालना १ लाख ९ हजार टन, तर बीड जिल्ह्यासाठी १ लाख ३५ हजार टन मिळून ४ लाख ३० हजार टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली. यामध्ये १ लाख ४२ हजार टन युरिया, ४६ हजार ७९८ टन डीएपी, २९ हजार १३४ टन एमओपी, १ लाख ८० हजार टन एनपीके, तर ३२ हजार ७८० टन एसएसपी खताचा समावेश होता. 

खतांपैकी तिन्ही जिल्ह्यांसाठी ९६ हजार ९१० टन युरिया, २० हजार ९६० टन डीएपी, १० हजार ६८० टन एमओपी, १ लाख १४ हजार टन एनपीके, तर ५२ हजार २३० टन एसएसपी खताचे आवंटन मंजूर करण्यात आले. १ ऑक्टोबरला तिन्ही जिल्ह्यांत मिळून १ लाख ४४ हजार ३८ टन खतसाठा उपलब्ध होता. त्यानंतर ४ हजार २४३ टन खताचा पुरवठा झाला. १ लाख ४८ हजार २८१ टन खतांपैकी १८ ऑक्टोबरपर्यंत ९ हजार १५६ टन विविध प्रकारच्या खतांची विक्री झाली होती. 

तिन्ही जिल्हे मिळून एक लाख ३९ हजार १२५ टन विविध प्रकारचे रासायनिक खते तिन्ही जिल्ह्यात उपलब्ध होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. रब्बी हंगाम थोडा उशिराने सुरू होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये खताची विक्री वाढेल. जवळपास ८० हजार टन विविध प्रकारची खते औरंगाबाद जिल्ह्यात उपलब्ध आहेत. खताचा तुटवडा भासणार नाही, याची दक्षता घेत आहोत. - प्रकाश देशमुख, जिल्हा परिषद, कृषी विकास अधिकारी, औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com