Agriculture news in marathi, Allocation of 2 lakh 95 thousand tons of fertilizers sanctioned | Page 3 ||| Agrowon

दोन लाख ९५ हजार टन खतांचे आवंटन मंजूर

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांसाठी २ लाख ९५ हजार ७०० टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. या तिन्ही जिल्ह्याच्या वतीने रब्बी हंगाम २०२१-२२ साठी ४ लाख ३० हजार ९९४ टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती.

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांसाठी २ लाख ९५ हजार ७०० टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. या तिन्ही जिल्ह्याच्या वतीने रब्बी हंगाम २०२१-२२ साठी ४ लाख ३० हजार ९९४ टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती.

अतिवृष्टी व लांबलेल्या पावसामुळे यंदाच्या रब्बी हंगाम लांबणीवर पडला आहे. खरिपात अतिवृष्टीने मोठे नुकसान केल्याने शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बीवर आहेत. संकटातून वाचलेल्या सोयाबीनची कापणी व मळणी सुरू असतानाच शेतकरी रब्बी हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या कामी लागला आहे. खरीप हातचा गेल्याने रब्बीत ज्वारी, हरभरा, मका, गहू आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. 

कृषी विभागाकडून औरंगाबाद जिल्ह्यासाठी १ लाख ८६ हजार टन, जालना १ लाख ९ हजार टन, तर बीड जिल्ह्यासाठी १ लाख ३५ हजार टन मिळून ४ लाख ३० हजार टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली. यामध्ये १ लाख ४२ हजार टन युरिया, ४६ हजार ७९८ टन डीएपी, २९ हजार १३४ टन एमओपी, १ लाख ८० हजार टन एनपीके, तर ३२ हजार ७८० टन एसएसपी खताचा समावेश होता. 

खतांपैकी तिन्ही जिल्ह्यांसाठी ९६ हजार ९१० टन युरिया, २० हजार ९६० टन डीएपी, १० हजार ६८० टन एमओपी, १ लाख १४ हजार टन एनपीके, तर ५२ हजार २३० टन एसएसपी खताचे आवंटन मंजूर करण्यात आले. १ ऑक्टोबरला तिन्ही जिल्ह्यांत मिळून १ लाख ४४ हजार ३८ टन खतसाठा उपलब्ध होता. त्यानंतर ४ हजार २४३ टन खताचा पुरवठा झाला. १ लाख ४८ हजार २८१ टन खतांपैकी १८ ऑक्टोबरपर्यंत ९ हजार १५६ टन विविध प्रकारच्या खतांची विक्री झाली होती. 

तिन्ही जिल्हे मिळून एक लाख ३९ हजार १२५ टन विविध प्रकारचे रासायनिक खते तिन्ही जिल्ह्यात उपलब्ध होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
रब्बी हंगाम थोडा उशिराने सुरू होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये खताची विक्री वाढेल. जवळपास ८० हजार टन विविध प्रकारची खते औरंगाबाद जिल्ह्यात उपलब्ध आहेत. खताचा तुटवडा भासणार नाही, याची दक्षता घेत आहोत.
- प्रकाश देशमुख, जिल्हा परिषद, कृषी विकास अधिकारी, औरंगाबाद


इतर बातम्या
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणी पोहोचली ३१...नगर ः रब्बी हंगामातील बहुतांश पिकांच्या पेरणीचा...
सातारा जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३) पावसाचा जोर...
रब्बी, उन्हाळी हंगामांत पिकांखालील...वर्धा : या वर्षी पाऊस लांबल्याने प्रकल्पांमध्ये...
सोलापूर :शेतकऱ्यांना दुधाळ गाई,...सोलापूर : पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गाई-...
वीज प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढणार...वाशीम : जिल्ह्यात विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर...