Agriculture news in marathi; Allocation of 63 villages under Aloke Pokra | Agrowon

अकोल्यात पोकराअंतर्गत ६३ गावांचे प्रकल्प आराखडे मंजूर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 जून 2019

अकोला ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) जिल्ह्यातील ६३ गावांच्या प्रकल्प आराखड्यास जिल्हा समितीने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात यापूर्वी ६२ गावांचे प्रकल्प आराखडे मंजूर करण्यात आलेले असून, आता एकूण १०५ प्रकल्प आराखडे मंजूर झाले आहेत.

अकोला ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) जिल्ह्यातील ६३ गावांच्या प्रकल्प आराखड्यास जिल्हा समितीने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात यापूर्वी ६२ गावांचे प्रकल्प आराखडे मंजूर करण्यात आलेले असून, आता एकूण १०५ प्रकल्प आराखडे मंजूर झाले आहेत.

जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्यातून राज्यात १५ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे. यात अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्याचा प्रामुख्याने समावेश केलेला आहे. हवामान बदलाचा भूगर्भातील पाणीसाठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी, शेतीतील पिकांची उत्पादकता घटत आहे. या परिस्थितीत हवामान बदलामुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे. 

अकोला जिल्ह्यातील ४९८ गावे या प्रकल्पात निवडण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात १०५ गावांपैकी ४२ ठिकाणचे प्रकल्प आराखडे मंजूर करण्यात आले होते. आता ६३ प्रकल्प आराखडे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या समितीच्या बैठकीत मंजुर करण्यात आले. समितीच्या बैठकीत अकोला व अकोट उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी याचे सादरीकरण केले.

या प्रकल्पांतर्गंत भूमिहीन, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. प्रकल्प कार्यान्वित होऊन नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम आता वेगाने सुरू करण्यात आले आहे. 

अशा आहेत प्रकल्पातील योजना 

  •  भूमिहीन तसेच अनुसूचित जाती / जमातीतील महिला शेतकऱ्यांसाठी-शेळीपालन, कुक्कुटपालन
  •  अल्प / अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांसाठी - फळबाग, शेडनेट, हरितगृह, प्लॅस्टिक टनेल, मधुमक्षिकापालन, नवीन विहीर, विहीर पुनर्भरण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मृदसंधारण, शेततळे, सामूहिक शेततळे, इतर कृषी आधारित व्यवसाय
  •  शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांसाठी - कृषी उत्पादनांचे संकलन केंद्र, कृषी उत्पादनांचे वर्गीकरण व प्रतवारी केंद्र, गोदाम व छोटे वेअर हाऊस, फळ पिकवणी केंद्र, कृषी मालावर प्राथमिक प्रक्रिया केंद्र, फळे व भाजीपाला वाहतुकीसाठी शीतवाहन, वातानुकूलित कृषी माल विक्री केंद्र, व्हेंडिंग कार्ट, कृषी माल प्रक्रिया केंद्र आणि कृषी आधारित व्यवसाय

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...