Agriculture news in marathi Allocation of Rabbi crop loan in Satara district is seven percent | Agrowon

सातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात टक्केच वाटप

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामात पीक कर्जवाटपाकडे बँकाकडून दुर्लक्ष केले जात आहे. रब्बीत गेल्या दोन महिन्यांत अवघे सात टक्के कर्ज वितरण केले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उर्वरित चार महिन्यांत किती उद्दिष्ट पूर्ण होणार, हा प्रश्‍न आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ९८० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी नोव्हेंबर महिनाअखेर ६८ कोटी ८८ लाख रुपये कर्जाचे वितरण केले आहे. दोन महिन्यांत अवघे सात टक्के कर्ज वितरण झाले. खरीप हंगामाप्रमाणेच राष्ट्रीयकृत बँकानी रब्बी हंगामात पीककर्ज वितरणाबाबत निराशा केली आहे. 

सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामात पीक कर्जवाटपाकडे बँकाकडून दुर्लक्ष केले जात आहे. रब्बीत गेल्या दोन महिन्यांत अवघे सात टक्के कर्ज वितरण केले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उर्वरित चार महिन्यांत किती उद्दिष्ट पूर्ण होणार, हा प्रश्‍न आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ९८० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी नोव्हेंबर महिनाअखेर ६८ कोटी ८८ लाख रुपये कर्जाचे वितरण केले आहे. दोन महिन्यांत अवघे सात टक्के कर्ज वितरण झाले. खरीप हंगामाप्रमाणेच राष्ट्रीयकृत बँकानी रब्बी हंगामात पीककर्ज वितरणाबाबत निराशा केली आहे. 

राष्ट्रीयीकृत बॅंकांचे ४४६ कोटी ७० लाखांचे उद्दिष्ट असून, यापैकी ३९ कोटी ३२ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. त्यांचे नऊ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. राष्ट्रीयीकृत बॅंकांत स्टेट बॅंक ऑफ इंडिया बॅंकेने सर्वाधिक १३ कोटी ४५ लाख कर्ज वितरण केले आहे. या बँकेने १३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यात २० राष्ट्रीयीकृत बँकांना कर्जवाटप उद्दिष्टे दिले आहे. यामध्ये १० बँकांनी शून्य कर्जवाटप केले आहे. 

खासगी बॅंकांनी एकूण उद्दिष्टापैकी १५ टक्के कर्जवाटप केले आहे. त्यांना १३१ कोटी ९० लाखांचे उद्दिष्ट आहे. या बँकानी २० कोटी २७ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले. 

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने नऊ कोटी २५ लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आल. जिल्हा बॅंकेने एकूण उद्दिष्टापैकी २ टक्के कर्जाचे वितरण केले. रब्बी कर्ज वितरण सरू होऊन दोन महिने उलटले. कर्ज वितरणाची मार्चअखेरपर्यंत मुदत आहे. उर्वरित कालवधीत किती कर्जवाटप होईल, हे पाहावे लागेल. खरीप हंगामात राष्ट्रीयकृत बँकानी पीककर्ज वितरणाकडे दुर्लक्ष केले होते. 

शेतकऱ्यांकडे लक्ष द्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भांडवल कमी पडू नये, यासाठी बँकानी शेतकऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मागीलवर्षी खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी बँकनिहाय जागोजागी शेतकरी मेळावे घेण्यात आले होते. यातून शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास मदत झाली. कर्जाचे वितरणही जास्त झाले. याच धर्तीवर शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी या हंगामात बँकांनी खरिपाप्रमाणे रब्बीतही शेतकरी मेळावे घेणे आवश्यक आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...