Agriculture news in marathi, Allotment of crop loan to 73,000 farmers in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर शेतकऱ्यांना वाटप

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या साडेचार महिन्यांमध्ये जिल्ह्यातील ७३ हजार ६३२ शेतकऱ्यांना ४३४ कोटी ६० लाख रुपये (२२.०९ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले. राष्ट्रीयकृत बॅंकांनी अद्याप पीक कर्जवाटपाच्या कामात वेग घेतलेला नाही. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टपार कर्जवाटप केले आहे. परंतु, ग्रामीण आणि खासगी बॅंकांनी उद्दिष्टाच्या निम्मेदेखील कर्जवाटप केले नसल्याची स्थिती आहे.

नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या साडेचार महिन्यांमध्ये जिल्ह्यातील ७३ हजार ६३२ शेतकऱ्यांना ४३४ कोटी ६० लाख रुपये (२२.०९ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले. राष्ट्रीयकृत बॅंकांनी अद्याप पीक कर्जवाटपाच्या कामात वेग घेतलेला नाही. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टपार कर्जवाटप केले आहे. परंतु, ग्रामीण आणि खासगी बॅंकांनी उद्दिष्टाच्या निम्मेदेखील कर्जवाटप केले नसल्याची स्थिती आहे.

खरीप हंगाम २०१९-२० मध्ये जिल्ह्यातील बॅंकांना १ हजार ९६७ कोटी ५१ हजार रुपये एवढे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. गुरुवार (ता. १५) पर्यंत राष्ट्रीयकृत बॅंकांनी १ हजार ३६० कोटी ७ लाख रुपये उद्दिष्ट असताना १० हजार ९४२ शेतकऱ्यांना १०४ कोटी २३ लाख रुपये (७.६६ टक्के) कर्जवाटप केले.

खासगी क्षेत्रातील बॅंकानी १५१ कोटी ६७ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी ३ हजार ४२० शेतकऱ्यांना ६३ कोटी १७ लाख रुपये (४१.६३ टक्के) पीक कर्जवाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २७७ कोटी १७ लाखांपैकी ८ हजार ४९२ शेतकऱ्यांना ५९ कोटी ९२ लाख रुपये (२१.५८ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने १७८ कोटी ६० लाखांपैकी ५० हजार ७७८ शेतकऱ्यांना २०७ कोटी ३८ लाख (११६.११टक्के) पीककर्ज वाटप केले.

राष्ट्रीयकृत बॅंकांनी पीक कर्जवाटपात अद्याप हात मोकळा सोडलेला नाही. त्यामुळे या बॅंकांची पीक कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती खूप दूर आहे. ग्रामीण बॅंक, खासगी बॅंकांचे कर्जवाटप उद्दिष्टाच्या निम्म्याहून कमी आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक पीक कर्जवाटपात आघाडीवर आहे.

पीक कर्जवाटप स्थिती (कोटी रुपये)

बॅंक  शेतकरी संख्या पीककर्ज टक्केवारी
राष्ट्रीयकृत बॅंका १०९४२  १०४.२३ ७.६६
खासगी बॅंका  ३४२०  ६३.१७  ४१.६३
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक ८४९२ ५९.९२  २१.५८
जिल्हा सहकारी बॅंक ५०७७८ २०७.३८ ११६.११

 


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...