मंत्र्यांना दालन, बंगल्यांचे वाटप

Allotment of rooms, bungalows to ministers
Allotment of rooms, bungalows to ministers

मुंबई ः ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी (ता. २) सर्व मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्याचसोबत सर्व मंत्र्यांना कार्यालयीन दालनांचेही वाटप करण्यात आले आहे. असे असले तरी ‘अपशकून’ समजले जाणारे सहाव्या मजल्यावरील ६०२ क्रमांकाचे दालन कुणालाच देण्यात आलेले नाही. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला देवगिरी बंगला आला आहे. तर अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे पाटील यांना शिवगिरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्‍वरी, डॉ. राजेंद्र शिंगणे यांना सातपुडा आणि राजेश टोपे यांना जेतवन हे बंगले मिळाले आहेत. ठाकरे सरकारमधील पहिल्या विस्तारात शपथ घेणाऱ्या सर्व ३६ जणांना सरकारी बंगल्यांचे वाटप झाले आहे. 

यापूर्वी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा तर छगन भुजबळ यांना रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत. सत्ताकेंद्र असलेल्या ‘मातोश्री’वर राहणारे आदित्य ठाकरे यांना अ-६ निवासस्थान मिळाले आहे. बच्चू कडू यांना रॉकिहिल टॉवर १२०२, विश्वजित कदम यांना निलांबरी ३०२, सतेज ऊर्फ बंटी पाटील यांना सुरुची-३ आणि अदिती तटकरे यांना सुनिती-१० हे निवासस्थान मिळाले आहे. 

तसेच उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्र्यांना दालनांचेही वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील ७१७ क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहाव्या मजल्यावरील उत्तरेकडील मुख्य दालन देण्यात आले आहे. मंत्रालयाव्यतिरिक्त काही राज्यमंत्र्यांना विधानभवनातील कार्यालयेही देण्यात आलेली आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com