लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११ कोटीवर अनुदान वाटप

Allotment of Rs. 11 crore for micro irrigation in Latur Division
Allotment of Rs. 11 crore for micro irrigation in Latur Division

नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा सोमवार (ता.१७) पर्यंत लातूर विभागातील पाच जिल्ह्यातील ५ हजार ६०५ शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार संचाचे ११ कोटी ६० लाख ४५ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. ठिबक आणि तुषार संचाचे मिळून एकूण ३ हजार ६६४.२८ हेक्टर एवढे क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सिंचन योजना सन २०१९-२० अंतर्गत पाच जिल्ह्यांसाठी एकूण ७८ कोटी १८ लाख ७२ हजार रुपयांची तरतूद आहे. त्यापैकी केंद्र शासनाच्या हिश्शाचे १६ कोटी ६९ लाख ३६ हजार रुपये आणि राज्य शासनाच्या हिश्शाचे ९ कोटी ६७ लाख ५ हजार रुपये असे एकूण २६ कोटी ३६ लाख ४१ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी ११ कोटी ६० लाख ४५ हजार रुपये खर्च झाले. १४ कोटी ७५ लाख ९६ हजार रुपये निधी शिल्लक आहे.

सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत अनुदानासाठी विभागातील ५७ हजार ६६८ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यांपैकी ३५ हजार ५०९ प्रस्तावांना पूर्वसंमती देण्यात आली. एकूण ७ हजार ८८५ शेतकऱ्यांची मोका तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६ हजार ९५३ शेतकऱ्यांना अनुदान देण्याची शिफारस करण्यात आली. अद्यापपर्यंत ५ हजार ६०५ शेतकऱ्यांना ११ कोटी ६० लाख ४५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. त्यात ठिबकचे ७ कोटी ५३ लाख ३८ हजार रुपये आणि तुषारचे ४ कोटी ७ लाख ८ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले.

शेतकरी लाभार्थ्यांमध्ये ठिबक संचासाठीचे २ हजार १३५ आणि तुषार संचाचे ३ हजार ४७० शेतकरी आहेत. ठिबक संचामुळे १ हजार ७४७.४७ हेक्टर आणि तुषार संचाद्वारे १ हजार ९१६.८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले, असे सूत्रांनी सांगितले.

जिल्हानिहाय लाभार्थी संख्या

जिल्हा ठिबक तुषार एकूण क्षेत्र (हेक्टर) निधी (कोटी)
नांदेड  ७६७ ६८२ १०७५.७४ ३.८७८२
परभणी ३६९ ४१८ ५४४.९६  १.८३६८
हिंगोली ४६२  ७८७ ७५४.१३ २.२९४१
लातूर २५०  ८३१ ६४९.१४ १.७६७७
उस्मानाबाद  २८७ ७५२ ६४०.३१  १.८२७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com