Agriculture news in marathi Allow farmers for two-wheelers, three-wheelers: Ravikant Tupkar | Agrowon

शेतकऱ्यांना दुचाकी, तीनचाकी वाहनांसाठी परवानगी द्या ः रविकांत तुपकर 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

बुलडाणा ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाद्वारे आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाने दुचाकी आणि तीनचाकी वाहनांबाबत घेतलेला निर्णय हा गोंधळ उडविणारा आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्ण, शेतकरी यांनाही अडविले जात आहे. रस्त्यावर दुचाकी व तीनचाकी दिसूच नये, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु कर्मचारी, रुग्ण, दूध-भाजीपाला उत्पादक दुचाकी, तीनचाकी वाहनांशिवाय फिरू शकत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्ण, शेतकऱ्यांना या वाहनांची परवानगी मिळावी. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सुधारणा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

बुलडाणा ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाद्वारे आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाने दुचाकी आणि तीनचाकी वाहनांबाबत घेतलेला निर्णय हा गोंधळ उडविणारा आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्ण, शेतकरी यांनाही अडविले जात आहे. रस्त्यावर दुचाकी व तीनचाकी दिसूच नये, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु कर्मचारी, रुग्ण, दूध-भाजीपाला उत्पादक दुचाकी, तीनचाकी वाहनांशिवाय फिरू शकत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्ण, शेतकऱ्यांना या वाहनांची परवानगी मिळावी. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सुधारणा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

जिल्हा प्रशासनाने जिल्हाभर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना बंदी घातली आहे. तसेच पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. ठरावीक भागात, ‘कोरोना’च्या दृष्टीने अतिसंवेदनशील भागात हा आदेश असणे आवश्यक आहे. मात्र, सर्वत्र हा आदेश लागू करण्यात आला. या आदेशाचे पालन करताना पोलिसांनी नर्स, महसूल कर्मचारी, रुग्ण, दूध वाटप करणारे शेतकरी, भाजीपाला विकणारे शेतकरी यांच्याही गाड्या अडविल्या. कर्मचाऱ्यांकडे त्यांचे ओळखपत्र असतानाही वाहनाचा परवाना मागण्यात आला. डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांचीही अडवणूक करण्यात आली. 

सर्वांकडे चारचाकी वाहन असणे अशक्य आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी, अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात दुचाकी, तीनचाकी वाहनांना मंजुरी देणे गरजेचे आहे. याबाबत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हा प्रशासनाशी देखील संपर्क साधून याबाबत विनंती केली आहे. जिल्हा प्रशासनाने दुचाकी आणि तीनचाकीच्या आदेशात सुधारणा करावी. तसेच ज्यांना प्रशासनाने पासेस दिल्या आहेत त्यांना वाहनांच्या वेगळ्या पासेस मागू नये, अशी मागणी केली आहे. 


इतर बातम्या
भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा...सोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...