येलदरी धरणामध्ये मासेमारीसाठी मच्छीमारांना परवाने द्यावेत

येलदरी धरणामध्ये मासेमारीसाठी मच्छीमारांना परवाने द्यावेत
येलदरी धरणामध्ये मासेमारीसाठी मच्छीमारांना परवाने द्यावेत

परभणी ः येलदरी धरणामध्ये मासेमारी करण्यासाठी मच्छीमारांना वडप व जाळ्याची मासेमारी करण्यासाठी परवाने वितरित करावेत, अन्यथा तलाव ठेका रद्द करण्यात येईल, असा इशारा मत्सव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त यांनी येलदरी (ता. जिंतूर) येथील पूर्णा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या अध्यक्षांना पत्राद्वारे दिला आहे.

येलदरी धरणात मासेमारी करत असताना पकडण्यात आलेले गावरान मासे योग्य राॅयल्टी आकरून विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी. मासेमारीच्या मासिक परवाना रकमेत करण्यात आलेली वाढ रद्द करून पूर्वीप्रमाणे आकारणी करण्यात यावी. रोहू, कटला, मृगळ, कोळंबी या माश्यांच्या मारी रकमेत वाढ करण्यात यावी. मासेमार सहकारी संस्थेच्या भाग भांडवलाचे लेखा परीक्षण करून हिशेबाच्या प्रती मासेमारी करणाऱ्या सभासदांना देण्यात यावा. मच्छीमारांना त्रास देणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी भोई समाज संघटनेतर्फे येलदरी धरणाच्या जलाशयामध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. परंतु या प्रकरणी औरंगाबाद येथील मत्स्यव्यवसाय उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार बुधवारी (ता. ६) चे जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

पूर्णा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेकडून अटी आणि शर्थीनुसार मच्छीमारांना परवाना दिल्याचे आढळून आलेले नाही. परवाना देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून आले आहे. तलावाचा ठेका मंजूर आदेश तसेच करारनाम्यातील अटी, शर्तीनुसार मच्छीमारांना परवाना देऊन रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे मच्छीमारांना तत्काळ वडप व जाळेची मासेमारी परवाना वितरित करण्यात यावा, अन्यथा तलाव ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, असा इशारा परभणी येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांनी मत्स्यव्यवसाय सहाकीर संस्थेच्या अध्यक्षांना दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com