अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
बातम्या
बुलडाणा : दूध उत्पादक, विक्रेत्यांना मुभा
जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी सुधारित पत्रक काढून दूध उत्पादक शेतकरी आणि वितरकांसाठी लॉकडाउनमध्ये वेळ वाढवून दिली आहे.
बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, याचा फटका दूध उत्पादक व विक्रेत्यांना बसण्याची चिन्हे निर्माण झाल्याने वेळा वाढवून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांची भेट घेऊन रविकांत तुपकर यांनी अडचणींची जाणीव करून दिली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सुधारित पत्रक काढून ही मागणी मान्य केली आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत. या निर्बंधात दूध उत्पादक शेतकरी, दूध वितरक आणि संकलन केंद्रांची मोठी अडचण होण्याची शक्यता होती. जनावरांच्या धारा काढण्याची वेळ, दूध संकलन आणि विक्रीची वेळ आणि संचारबंदीच्या आदेशात मेळ लागत नव्हता. नुकसान होण्याची शक्यता असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तुपकर यांनी दूध उत्पादक व विक्रेत्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी राममूर्ती यांच्याशी भेटून चर्चा केली होती.
आयुक्त पियुष सिंग यांच्याशी फोनवरून चर्चा करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. संघटनेच्या या मागणी दखल घेत आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूध उत्पादक व विक्रेत्यांना सूट देण्यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लॉकडाऊनचे सुधारित आदेश देत दूध उत्पादकांना, संकलन व वितरण केंद्रांना हवी असलेली सुधारित वेळ ठरवून दिली आहे.
आता सकाळी सहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंतची वेळ उपलब्ध असणार आहे. सकाळपासून दुपारपर्यंत नऊ तास आणि सायंकाळी अडीच तासांची मुभा मिळाली आहे. यामुळे दूध उत्पादक, विक्रेते व संकलन केंद्र संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- 1 of 1537
- ››