agriculture news in marathi Almost rabbi sowing in Pathrud | Agrowon

पाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

पाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूड परिसरात गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

पाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूड परिसरात गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

ज्वारीच्या पेरणीस परतीच्या पावसामुळे तब्बल तीन आठवडे उशीर झाला आहे. त्यामुळे बैल बारदाना (बैलजोडी ) असणाऱ्या शेतकऱ्यांना महत्व प्राप्त झाले आहे. काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत असल्याचे दिसून येत आहे. परतीच्या दमदार पावसामुळे हस्त नक्षत्रामध्ये पेरणी झालेली ज्वारीचे पिके मोडून दुबार पेरणी करावी लागत आहे. 

गेल्या पाच - सहा दिवसांपासून जमिनीत वाफसा आल्याने शेतकरी पेरणीची घाई करू लागले आहेत. ज्वारीच्या उत्पादनासाठी भूम तालुक्यातील पाथरूड परिसरातील भाग प्रसिद्ध आहे. मालदांडी, झुट, सफेदगंगा, बेद्रे, पाण्याचे दगडे, माळ दगडे या वाणांची पेरणी होऊ लागली आहे. सततच्या पावसामुळे वाफसा येण्यास विलंब झाला.

एक दिवसाचे बैलजोडीचे भाडे १२०० ते दीड हजार रुपये आहे. अनेक शेतकऱ्यांना बैल, बारदाना मिळत नसल्याने काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करीत आहेत. 
पेरणीस उशीर झाल्यामुळे हरभरा, गव्हाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

काही शेतकरी असे सांगतात की तुळशीच्या लग्नापर्यंत ज्वारीची पेरणी केली, तरी चांगले उत्पन्न मिळते. परतीचा पाऊस भरपूर चांगला झाल्याने पाणीसाठा वाढला आहे. 
 


इतर बातम्या
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...