Agriculture news in Marathi Also pay regular loan waiver to farmers | Agrowon

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफी करा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मेढा, जि. सातारा : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफी करण्याची मागणी सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र आणि आम्ही जावळीकर चळवळीच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली. 

मेढा, जि. सातारा : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफी करण्याची मागणी सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र आणि आम्ही जावळीकर चळवळीच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली. 

निवेदनात प्रारंभी महाआघाडी सरकारने राज्यातील थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त केले आहे. पण, नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकरी मात्र, आपली समाजातील पत सांभाळण्यासाठी गावातील सोसायटी, बॅंक थकीत राहू नये, गावचा पर्यायाने देशाचा आर्थिक समतोल राखण्यासाठी घेतलेले कर्ज फेडण्याची परिस्थिती नसताना जिवाचे रान करून, पोटाला चिमटा काढून, बायको, मुलगी यांच्या अंगावरील दागिने प्रसंगी गहाण ठेवून किंवा दागिने मोडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करतो. गहाण ठेवलेले दागिने सोडविण्यासाठी परत दुसरे कर्ज घेतो आणि तेही दरवर्षी नियमित भरतो. त्याला मात्र, कसलाही लाभ होत नाही. सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते. मागील तीनही कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय तरी कधी मिळणार? नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देऊन सरकारने न्याय द्यावा. 

निवेदन देण्यासाठी सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष बजरंग चौधरी, सुनील धनावडे, अरुण जवळ, विजय वांगडे, प्रकाश धनावडे उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...
नगर : पैसेवारी कमी लावून प्रशासनाने...नगर ः यंदाही रब्बी हंगामात पीक परिस्थिती फारशी...
स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. पाटील...मुंबई   : ग्रामविकास विभागामार्फत...
रिक्त पदांमुळे सातारा ‘एकात्मिक...भिलार, जि. सातारा : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे...सिंधुदुर्ग : गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात...
मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका...मुंबई : राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी...
परभणीत काकडी ५०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
हरितगृह : बारमाही उत्पन्नाचा आकर्षक...पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेपासून केवळ २० किमी...