भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
कारखान्यांनी सीएनजी गॅसही तयार करावा : पवार
राज्याला समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी साखर कारखानदारांची महत्त्वाची भूमिका आहे. आता कारखान्यांनी सीएनजी गॅस तयार करण्यावरही भर द्यावा, असे मत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
शिराळा, जि. सांगली : राज्याला समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी साखर कारखानदारांची महत्त्वाची भूमिका आहे. साखर उद्योगात वीजनिर्मिती, इथेनॉल, लिकर यांची निर्मिती केली जाते. त्याचबरोबर आता कारखान्यांनी सीएनजी गॅस तयार करण्यावरही भर दिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
चिखली (ता. शिराळा) शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी पाच वाजता येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानंतर ते बोलत होते. नवीन व्यावसायिक दालने सुरू करा. लागेल ती मदत करू, असे त्यांनी सांगितले.
वेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार, कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मानसिंगराव नाईक, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार मोहनराव कदम, आमदार सुमन पाटील, अरुण लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘कारखान्यांमार्फत सीएनजी गॅसची निर्मिती झाल्यास कमी दरात लोकांना गॅस मिळू लागल्यास पैसे वाचतील. कारखान्यांना अधिक उत्पन्न मिळेल. त्याचबरोबर या उत्पादनातून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळेल. त्यामुळे कारखान्यांनी अशा नवनवीन प्रयोगांना प्राधान्य द्यावे. फत्तेसिंगराव नाईक यांचा पुतळा नव्या पिढीत चेतना निर्माण करून प्रेरणा देण्याचे काम करेल.’’
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘‘उत्तर भागाच्या पाण्याच्या प्रश्नाचे अप्पांचे स्वप्न वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून दोन वर्षांत पूर्ण झालेले दिसेल. मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नातून चांदोली पर्यटनास लवकरच गती मिळेल.’’
माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, ‘‘डोंगरी विभागासाठी अप्पांनी केलेले काम दिशादर्शक आहे. त्यांच्या सानिध्यात आलेल्या लोकांना ते साथ देत. निवडणुकीकडे राजकारणात पुरते पाहून सर्वांगीण विकासासाठी झटणारे त्यांचे नेतृत्व होते.’’
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, अप्पांच्या कार्याची प्रचिती व त्यांनी दिलेला विश्वास न विसरण्यासारखा आहे. शिराळा, वाळवा व कऱ्हाड तालुक्याच्या पाण्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले.’’
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, ‘‘अप्पांनी शेतीच्या पाण्याचा ध्यास घेऊन काम केले. उत्तर भागाला पाणी मिळण्याचे स्वप्न जयंत पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण होईल.’’ विराज नाईक यांनी स्वागत केले. अमरसिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक, साम्राटसिंह नाईक, ॲड. भगतसिंग नाईक, सुनीतादेवी नाईक, नगराध्यक्षा सुनीता निकम, दिनकरराव पाटील, शिवाजीराव घोडे, विष्णू पाटील, विश्वास कदम, कार्यकारी संचालक राम पाटील उपस्थित होते.