agriculture news in marathi Always be ready to help the farmers: Dawle | Page 3 ||| Agrowon

शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः डवले

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

नांदेड : ‘‘तालुका कृषी अधिकाऱ्यांनी व्यापक भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहावे’’, असे निर्देश कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिले.

नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालावर प्रक्रिया करण्याचे कसब शेतकऱ्यांच्या अंगी यावे. प्रक्रिया करून उत्पादित केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ व योग्य भाव कसा मिळेल, याचे संपूर्ण कसब देण्यापर्यंतची भूमिका ही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. या साठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी व्यापक भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहावे’’, असे निर्देश कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिले.

जिल्ह्यातील विविध विकास योजनांची आढावा बैठक शुक्रवारी (ता. ११) डवले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनील लहाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी अधिकारी उपस्थित होते.

डवले म्हणाले, ‘‘‘विकेल ते पिकेल’ या साठी तालुका पातळीवरून प्रयत्न व्हायला पाहिजेत.  शेतकरी गटांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनाला योग्य भाव मिळाला पाहिजे, या साठी ग्रामीण भागात कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेतली पाहिजे. तरच सर्वसामान्य शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे मिळतील.’’ 

‘‘एक गाव, एक वाण’मध्ये कापूस आणा’ 

‘‘‘एक गाव, एक वाण’ या खाली कापूस लागवड आणावी. कापसाच्या उत्पादनाला काढणीपश्चात तंत्रज्ञानाची जोड द्यावी. कापूस कचराविरहित गोळा केला, तर अशा कापसाला अधिकचा भाव मिळू शकेल. धागा चांगला यावा, यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे. स्मार्ट कॉटनसाठी आग्रह धरला पाहिजे. कापसावर बोंड आळी व्यतिरिक्त बोंडसडसाठी अधिक दक्षता घ्यावी’’, असेही डवले म्हणाले. देगलूर, अर्धापूर आणि इतर काही ठिकाणी करडी, हळद व इतर पिकातून झालेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.


इतर ताज्या घडामोडी
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....
नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे...नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या...
खानदेशात सोयाबीन पेरणीत घटजळगाव : खानदेशात यंदा नापेर क्षेत्र यंदा वाढणार...
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...