पीकविमा, जीवनावश्यक वस्तू कायद्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार : अमर हबीब

अमर हबीब
अमर हबीब

पुणे  ः जीवनावश्‍यक कायद्याचा आधार घेत सरकार शेतीमाल निर्यातीवर सातत्याने बंदी घालते. यामुळे शेतकऱ्यांना वाढलेल्या बाजारभावाचा फायदा घेता येत नाही. या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आला असल्याने हा कायदाच रद्द करण्यात यावा. तसेच सध्याची पीकविमा पद्धत सरकारधार्जिणी असल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये तोकडा मोबदला मिळत असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे या विरोधात किसानपुत्र आंदोलन उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी दिली. 

किसानपुत्र आंदोलनाचे ७ वे राज्यस्तरीय चिंतन शिबिर नुकतेच पार पडले. शिबिरात शेती आणि शेतीमाल बाजारपेठेच्या सद्यःस्थितीवर विचारमंथन करण्यात आले. या वेळी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि पीकविम्यातील अडचणींमुळे शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळत नाही. यामुळे आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. पीकविम्याची प्रचलित पद्धत सरकारधार्जिणी असल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे कृषी विमा क्षेत्र सरकारच्या नियंत्रणातून पूर्णपणे मुक्त करण्यात यावे अशी मागणी या वेळी करण्यात आली. न्यायालयीन लढ्यासाठी डॉ. आशिष लोहे आणि ॲड. महेश गजेंद्रगडकर हे पुढाकार घेणार आहे.

किसानपुत्र आंदोलनाच्या विविध आघाड्या स्थापन शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विविध आघाड्या स्थापन करण्यात आल्या असून, त्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत अमर हबीब, मयूर बागूल व नितीन राठोड यांचा समावेश करण्यात आला आहे. विविध आघाड्या पुढीलप्रमाणे ः जनआंदोलन आघाडी ः डॉ. आशिष लोहे, न्यायालयीन आघाडी ः मकरंद डोईजड,  संसदीय आघाडी ः ॲड. महेश गजेंद्रगडकर, प्रचार व प्रसार आघाडी ः अस्लम सय्यद, राष्ट्रीय आघाडी ः अनंत देशपांडे, महिला आघाडी ः आयुषी मोहगावकर,  युवक आघाडी-ः सतीश देशमुख, वकील आघाडी ः ॲड. सागर पिलारे, अभ्यास आघाडी  ः राजीव बसरगेकर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com