agriculture news in marathi, Amaravati records highest temperature in state | Agrowon

उन्हाचा ताप वाढण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

पुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा सातत्याने वाढतच आहे. सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक ४१.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, परभणी, बीड येथे तापमान चाळिशीपार गेले अाहे. आजपासून (ता. २६) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे, तसेच उन्हाचा तापही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली अाहे.  

पुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा सातत्याने वाढतच आहे. सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक ४१.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, परभणी, बीड येथे तापमान चाळिशीपार गेले अाहे. आजपासून (ता. २६) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे, तसेच उन्हाचा तापही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली अाहे.  

मार्च महिन्यात राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा ३९ अंशांच्या पुढेच राहिला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाड्याही वाढ होत अाहे. सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा येथे देशातील उच्चांकी ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाराष्ट्रातील अमरावती येथे ४१ अंश, सोलापूर येथे ४०.८, बीड ४०.४ आणि परभणी येथे ४०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकण, वगळता राज्यात बहुतांशी तापमान ३८ अंशांच्या पुढे गेेले आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती,  असून त्यापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा सोमवारी विरून गेला होता. परिणामी राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली अाहे. 

रविवारी (ता. २४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.४ (२.१), धुळे ३९.०, जळगाव ३९.६ (०.८), कोल्हापूर ३८.९ (२.२), महाबळेश्वर ३४.६ (३.३), नाशिक ३७.६ (१.६), सातारा ३८.६ (३.०), सोलापूर ४०.८ (२.१), आलिबाग ३२.३ (१.३), डहाणू ३४.३ (३.१), सांताक्रूझ ३६.७ (३.९), रत्नागिरी ३१.० (-०.६), औरंगाबाद ३८.२ (१.७), बीड ४०.४ (३.१) परभणी ४०.३ (२.०), नांदेड ३९.५ (०.९), अकोला ३९.६ (१.३), अमरावती ४१.० (२.७), बुलडाणा ३६.५ (१.६), बह्मपुरी ३९.५ (१.८), चंद्रपूर ३९.० (-०.१), गोंदिया ३५.६ (-१.८), नागपूर ३७.९ (०.३), वाशीम ३७.४, यवतमाळ ३९.० (१.५).

इतर अॅग्रो विशेष
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...
विषबाधेबाबत गांभीर्य कधी?घटना क्रमांक १ ः तारीख - ४ मे २०१९, ठिकाण -...
समवर्ती लेखापरीक्षणातूनच टळतील...इ.स. पूर्व सहाव्या शतकापूर्वी प्राचीन इजिप्शियन...
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...