agriculture news in marathi, Amaravati records highest temperature in state | Agrowon

अमरावती सर्वांत उष्ण, मुंबईत उष्णतेची लाट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मार्च 2019

पुणे : राज्यात उन्हाची ताप सातत्याने वाढत असल्याने उन्हाळा जाणवू लागला आहे. मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमान ४०.३ अंशांवर पोचल्याने, तसेच त्यात सरासरीच्या तुलनेत ७.५ अंशांची वाढ झाल्याने मुंबईत उष्णतेची लाट आली होती. राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार गेल्याने उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे.  

पुणे : राज्यात उन्हाची ताप सातत्याने वाढत असल्याने उन्हाळा जाणवू लागला आहे. मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमान ४०.३ अंशांवर पोचल्याने, तसेच त्यात सरासरीच्या तुलनेत ७.५ अंशांची वाढ झाल्याने मुंबईत उष्णतेची लाट आली होती. राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार गेल्याने उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे.  

कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे असेल आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाली असेल तर उष्णतेची लाट आणि ६.४ अंशांपेक्षा अधिक वाढ झाली असेल तर उष्णतेची तीव्र लाट समजली जाते. मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार गेले असून, अमरावती येथे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर परभणी आणि अकोला येथे ४१.४ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम मध्य प्रदेशातील खारगोणे येथे देशातील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

मंगळवारी (ता. २५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.२ (३.९), धुळे ४०.२, जळगाव ४०.६ (१.८), कोल्हापूर ३८.७ (२.०), महाबळेश्वर ३४.० (२.७), नाशिक ३९.१ (३.१), सांगली ३९.० (१.३), सातारा ३९.१ (३.५), सोलापूर ४०.७ (२.०), आलिबाग ३३.५ (०.९), डहाणू ३३.५ (२.३), सांताक्रूझ ४०.३ (७.५), रत्नागिरी ३२.५ (२.४), औरंगाबाद ३८.४ (१.९), परभणी ४१.४ (३.१), अकोला ४१.४ (३.१), अमरावती ४१.६ (३.३), बुलडाणा ३७.२ (२.३), बह्मपुरी ३९.७ (२.०), चंद्रपूर ४०.२ (१.१), गडचिरोली ३८.२, गोंदिया ३५.५ (-१.९), नागपूर ३९.१ (१.५), वाशीम ३९.०, वर्धा ३९.९ (१.९), यवतमाळ ४०.० (२.५). 

४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झालेली ठिकाणे : 
अमरावती ४१.६, परभणी ४१.४, अकोला ४१.४, सोलापूर ४०.७, जळगाव ४०.६, सांताक्रूझ ४०.३, धुळे ४०.२, पुणे ४०.२, चंद्रपूर ४०.२, यवतमाळ ४०.०. 

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...