agriculture news in marathi, Amaravati records highest temperature in state | Agrowon

देशातील उच्चांकी तापमानाची अमरावतीत नोंद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 मार्च 2019

पुणे  : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राज्यातील बहुतांशी शहरांतील उन्हाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्यावर गेला आहे. यामुळे अनेक ठिकाणी उन्हाची लाहीलाही झाली असून, उकाड्यात चांगलीच वाढ झाली. गुरुवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत अमरावती येथे देशातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे  : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राज्यातील बहुतांशी शहरांतील उन्हाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्यावर गेला आहे. यामुळे अनेक ठिकाणी उन्हाची लाहीलाही झाली असून, उकाड्यात चांगलीच वाढ झाली. गुरुवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत अमरावती येथे देशातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

सध्या बंगालचा उपसागर ते कर्नाटकाचा दक्षिण परिसर, मन्नार आणि तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचे पट्टा सक्रिय होत आहे तसेच, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा परिसर आणि कर्नाटकाच्या उत्तर भागात समु द्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. उद्यापासून (शनिवारी) मध्य महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

राज्यात सायंकाळनंतर वातावरण थंड होत असले, तरी पहाटे हवेत काही प्रमाणात गारवा तयार होतो. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत आहे. दुपारी उन्हाचा पारा चांगलाच वाढत असून, कमाल तापमान ४२ अंशांपर्यंत पोहचले आहे. खान्देशातही जळगाव, मालेगाव येथील तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्यावर गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापुरातही तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. मराठवाडा, विदर्भातही उन्हाचा चटका वाढला आहे.     

गुरुवारी (ता.२८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३९.२ (१९.०), नगर (१८.६), जळगाव ४१.० (१९.२), कोल्हापूर ३७.६ (२२.७), महाबळेश्‍वर ३४.७ (१९.६), मालेगाव ४१.६ (१९.६), नाशिक ३८.५ (१८.४),  सांगली ३८.५ (१०.१), सातारा ३९.२ (१९.७), सोलापूर ४१.२ (२४.९), सांताक्रूझ ३३.३ (२२.६), अलिबाग ३२.४ (२१.७), रत्नागिरी ३२.२ (२४.७), डहाणू ३३.१ (२१.०), औरंगाबाद ३९.० (१९.४), बीड ४०.०, नांदेड ४०.० (२१.०), परभणी ४१.६ (२०.०), अकोला ४१.१ (२०.१), अमरावती ४२.२ (२२.२), बुलडाणा ३७.४ (२२.२),  ब्रह्मपुरी ४०.७ (२२.६), चंद्रपूर ४१.४ (२५.०), गडचिरोली ३८.८ (२२.०), गोंदिया ३५.४ (१८.६), नागपूर ३९.१ (१९.१), वर्धा ४०.० (२१.४), वाशिम ४०.० (२१.०), यवतमाळ ४०.५ (२३.४).

इतर अॅग्रो विशेष
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...
विमा कंपन्यांचे आस्ते कदम; पंचनाम्याकडे...पुणे : राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त...
अकोला, बुलडाण्याला खरिपात ७२५ कोटींचा...अकाेला ः गेल्या महिन्यात झालेल्या संततधार पाऊस व...
पावसाचा मराठवाड्यात ४१ लाख हेक्‍टर...औरंगाबाद : मराठवाड्यात मॉन्सूनोत्तर पावसाने...
ग्रामपरिवर्तनाची दिशा दाखविणारे शेंदोळा...जन्म, मृत्यू, विवाहनोंदणी प्रमाणपत्र हवे असेल; तर...
रत्नागिरी : गतवर्षीच्या तुलनेत भात...रत्नागिरी ः अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकरी चांगलाच...
दक्षिण आफ्रिकेतील 'मालावी हापूस'...पुणे  ः दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागांना आता...सांगली ः गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी...
राज्यात रब्बीसाठी सव्वासहा हजार शेतीशाळापुणे : रब्बी हंगामात राज्यात सव्वासहा...
केंद्र सरकारकडून एक लाख टन कांदा...पुणे: मॉन्सूनचा वाढलेला मुक्काम, अतिवृष्टी,...
बाजार समित्या बरखास्त करणार : केंद्रीय...नवी दिल्ली : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि...
राज्य झाले टॅंकरमुक्त; केवळ बुलडाण्यात...पुणे: मॉन्सून आणि मॉन्सूनोत्तर काळात राज्यात...
केसर आंब्याचे उत्पादन ४५ टक्के घटणार;...औरंगाबाद : गंध आणि चवीसाठी केसर आंब्याची आपली...
किमान तापमानात चढ-उतारपुणे: मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर...