अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यात  ‘सीताफळ हब’ः डॉ. अनिल बोंडे 

अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यात  ‘सीताफळ हब’ः डॉ. अनिल बोंडे 
अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यात  ‘सीताफळ हब’ः डॉ. अनिल बोंडे 

मुंबई ः शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळाची लागवड, संगोपन, प्रक्रिया तसेच विपणन व्यवस्थेचा विकास करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात खेड (ता. मोर्शी) आणि बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सीताफळ हब विकसित करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. 

सीताफळाच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने डॉ. बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी डाॅ. बोंडे म्हणाले, की सीताफळ हे पीक विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणू शकते. सीताफळाची रोपे व झाडांना वन्य प्राणी खात नसल्याने इतर पिकांच्या तुलनेत याची लागवड फायदेशीर ठरू शकते. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विदर्भात सीताफळ हब निर्माण करुन शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळ लागवड, फळांची साठवणूक, गर काढणे, त्यावर प्रक्रिया, रोपवाटिका विकास, ठिबक सिंचन पद्धती, विपणन व्यवस्थेचा विकास करण्याचे नियोजन करण्यात येईल. ‘‘कृषी विभागाने तत्काळ प्रस्ताव सादर करावा. सीताफळ लागवड अनुदानाबाबतचे पॅकेज निश्चित करण्यासाठी कृषी विद्यापीठाची मदत घ्यावी,’’ असेही निर्देश डॉ. बोंडे यांनी दिले. 

बैठकीस कृषी विभागाचे सहसचिव अशोक आत्राम, कृषी सहसंचालक (फलोत्पादन) शिरीष जमदाडे, संशोधन संचालक व्ही. के. खर्चे, सीताफळ महासंघाचे सचिव अनिल रा. बोंडे, अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अ. म. इंगळे, फलोत्पादन उपसंचालक सु. वि. भालेराव आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com