अंबडमध्ये विक्रीअभावी फळे झाडावरच

‘‘अंबड शेतशिवारात गट नंबर १७ मधील सरासरी तीन एकरमधील ४०० मोसंबी झाडे आहेत. मात्र तोडणीला विलंब होत असल्याने फळे पिवळे पडून वजन घटत आहे. फळ गळती होत आहे. त्यातच उन्हाळयाचे कडक दिवस सुरु झाले आहेत. भिषण पाणी चंटाईचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे होत्याचे नव्हते झाले आहे. मोठया अर्थिक समस्याला तोंड द्यावे लागत आहे.’’ - प्रभाकर धाईत, मोसंबी उत्पादक
 In Ambad, the fruit is on the tree without sale
In Ambad, the fruit is on the tree without sale

अंबड, जि. जालना : दिवसरात्र काबाड कष्ट करून संकटावर मात करीत कधी विकतचे पाणी घेऊन हि दुष्काळात व पाणी टंचाईत मोसंबी फळबागा जोपासल्या. मात्र विक्री होत नसल्याने मोसंबी झाडाला अजुनही लटकलेली असल्याने मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. 

अंबड तालुका हा जिल्ह्यात मोसंबी उत्पादनासाठी अग्रेसर आहे. दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीची शेतकऱ्यांनी लागवड केली. मात्र मोसंबी उत्पादकांना सतत दुष्काळ, भिषण पाणीटंचाई, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, वादळ, वारे आदी आपत्तीचा फटका बसत आहे. 

पावसाने अनेकदा दगाफटका दिल्याने शेतकऱ्यांच्या मोसंबी फळबागा नष्ट झाल्या. तर, अनेकांनी कुऱ्हाड चालविली. अनेकांनी जळणासाठी सरपण केले. आता कोरोना संकटामुळे उदभवलेल्या बिकट परीस्थितीत लॉकडाऊन करण्यात आले. घरातून बाहेरच पडता येत नसल्याने मोसंबी खरेदीसाठी व्यापारी फिरकत नाहीत. यामुळे फळबागा विक्रीअभावी तशाच पडून आहेत.

फळे पिवळी पडत आहेत. पाणी नसल्याने फळांचे वजन घटत आहे. बाजारपेठा, वाहतुक व्यवस्था ठप्प आहे. यासह आदी अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. फळबागाची मोठी वाताहात होत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com