Agriculture News in Marathi In Ambegaon taluka Start planting potatoes | Agrowon

आंबेगाव तालुक्यात  बटाटा लागवड सुरू 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

बटाटा उत्पादनाचे आगार असणाऱ्या आंबेगाव तालुक्‍यातील लौकी, महाळुंगे पडवळ, कळंब, चास आदी ३० गावांत रब्बी हंगामातील बटाटा लागवडीला सुरुवात झाली आहे.

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : बटाटा उत्पादनाचे आगार असणाऱ्या आंबेगाव तालुक्‍यातील लौकी, महाळुंगे पडवळ, कळंब, चास आदी ३० गावांत रब्बी हंगामातील बटाटा लागवडीला सुरुवात झाली आहे. मजूरटंचाईवर मात करण्यासाठी ट्रॅक्‍टरच्या साह्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. 

हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) १०० टक्के भरले आहे. तसेच घोडनदी, उजव्या व डाव्या कालव्यांना पाणी सोडले आहे. त्यामुळे शाश्‍वत पाणी उपलब्ध झाले आहे. चांडोली बुद्रुक, महाळुंगे पडवळ, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, थोरांदळे, भराडी, नागापूर, जाधववाडी, रांजणी आदी ४० गावांत बटाटा लागवड केली जात आहे. नगदी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून बटाटा पीक आहे. कोरोनामुळे बटाटा लागवड करण्यासाठी मजुरांची टंचाई आहे. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्‍टरच्या साह्याने लागवडी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
 
‘‘चार एकर क्षेत्रात बटाटा बियाण्याची लागवड केली आहे. लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने यांत्रिकीकरणाचा वापर बटाटा लागवड करत आहेत. एक हजार रुपये तास या प्रमाणे ट्रॅक्‍टरद्वारे लागवडीचा दर आहे. यंत्राद्वारे लागवड केल्यामुळे बियाणे जमिनीत गाडून सरी वरंबा तयार होतो. तसेच वेळ, पैसा व खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते,’’ असे लौकी येथील शेतकरी श्रीकांत थोरात यांनी सांगितले. 

‘‘बटाटा वाणाचे बाजारभाव या वर्षी कमी आहेत. तसेच धरण भरल्याने शाश्‍वत पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बटाटा लागवड क्षेत्रात वाढ होईल. जवळपास २५० हेक्‍टर क्षेत्रात रब्बी हंगामात लागवड होईल असा अंदाज आहे,’’ असे आंबेगाव तालुक्‍याचे कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी सांगितले. 

 


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...