Agriculture news in marathi In the Ambeohal project 30% water storage | Agrowon

आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ प्रकल्पात पहिल्यांदाच  ३० टक्के पाणी साचले आहे, ही समाधानाची बाब असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ प्रकल्पात पहिल्यांदाच  ३० टक्के पाणी साचले आहे, ही समाधानाची बाब असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात मंत्री मुश्रीफ यांनी या प्रकल्पाबद्दल महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा कृतज्ञतापर सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. 

मुश्रीफ म्हणाले, ‘‘कृष्णा खोरे लवादाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याचे एक थेंबही पाणी गेल्या दहा वर्षांत अडवले नव्हते. आंबेओहळ प्रकल्पाच्या रूपाने हे पाणी अडविण्यात यश मिळाले. आंबेओहळच्या शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे वचन मी दिले होते.’’ 

या वेळी उपजिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे आदी अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पाची सहा हजार हेक्टर सिंचन क्षमता आहे. १,२५० एमसीएफटी पाणी या प्रकल्पात अडविले जाणार आहे.

सातपैकी सहा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्ण झाले असून, एका बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित पुनर्वसन वाटपासाठी ३८ हेक्‍टर जमिनीची गरज आहे, त्यापैकी २२ हेक्टर जमीन शिल्लक आहे. अधिकाऱ्यांकडून जमिनीची गुणवत्ता तपासावयाचे आहे. ३५ शेतकऱ्यांची जमीन मागणी असून, ३१ शेतकऱ्यांनी पॅकेज मागणी केलेली आहे. परंतु; महसूल विभागाने वारंवार पत्र लिहूनही ते लोकच आलेले नाहीत. त्यामुळे करारनामे करण्यामध्ये अडचणी 
येत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...