मोसंबीत अंबिया बहार फायदेशीर ः डॉ. कच्छवे

अंबड, जि. जालनाः ‘‘उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता असेल, तर अंबिया बहार हा जानेवारी, फेब्रुवारीत घेतला जातो. अंबिया बहाराची फळे ही जास्त रसदार, गोड, आकाराने मोठी, टिकाऊ व दर्जेदार असतात.
  Ambia Bahar Beneficial in sweet lemon : Dr. Kachave
Ambia Bahar Beneficial in sweet lemon : Dr. Kachave

अंबड, जि. जालना ः ‘‘उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता असेल, तर अंबिया बहार हा जानेवारी, फेब्रुवारीत घेतला जातो. अंबिया बहाराची फळे ही जास्त रसदार, गोड, आकाराने मोठी, टिकाऊ व दर्जेदार असतात. मार्केटमध्ये भाव ही जास्त मिळतो. त्यामुळे अंबिया बहार महत्त्वाचा आहे,’’ असे बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दीपक कच्छवे यांनी सांगितले.

आत्मा व फलोत्पादन कीड व रोग सर्वेक्षण प्रकल्पाअंतर्गत  कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण कार्यक्रम घुंगर्डे  हादगाव येथे शेतकरी सचिन चोरमले यांच्या मोसंबीच्या बागेत घेण्यात आला. डॉ. कच्छवे यांनी ‘मोसंबी पिकातील छाटणी व बहार व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन केले.

डॉ. कच्छवे म्हणाले, ‘‘मोसंबीत अंबिया, मृग व हस्त असे तीन प्रकारचे बहार असतात. वर्षातून कोणताही एकच बहार धरावा म्हणजे झाडांचे आयुष्य वाढेल. जर पाण्याची उपलब्धता नसेल, तर मृग बहार धरावा. या बहारामध्ये कीड व रोगांचे प्रमाण कमी असते. फळेही जास्त प्रमाणात झाडावर लागतात.’’ 

कृषी सहायक सव्वाशे म्हणाले, ‘‘ठिबक सिंचन पद्धतीचा वापर, खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, वळण देण्याची पद्धती आणि बहार व्यवस्थापन, या पंचसूत्रीचा वापर करून शेतकऱ्यांनी मोसंबीचे दर्जेदार उत्पादन घ्यावे.’’

कृषी सहायक  गोवर्धन उंडे यांनी आभार मानले. ‘आत्मा’च्या कर्मचारी वंदना खरात, पोक्राचे शेतीशाळा समन्वयक साईनाथ खरात, कबीर पवार, सचिन चोरमले, राधा किसन मोटे, शिवाजी शिंगटे, सोमनाथ तळतकर, डॉ. राजेंद्र चोरमले, अर्जुन भद्रे, प्रदीप जोशी, रमेश मस्के, कृष्णा पवार, भाऊसाहेब मस्के, संदीप खापरे,अर्जुन घोलप, सावता काळे व कृषी मित्र गणेश फिस्के आदी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com