Agriculture news in marathi Amendment records pending on Satbara in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात सातबारावरील फेरफार नोंदी प्रलंबित

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 सप्टेंबर 2021

जळगाव : जिल्ह्यात सातबारा उताऱ्यावरील अनेक नोंदी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या अंगकाढूपणामुळे प्रलंबित आहेत. जळगाव तालुक्यात एकट्या पिंप्राळा महसूल मंडळात तब्बल ७०० नोंदी प्रलंबित आहेत.

जळगाव : जिल्ह्यात सातबारा उताऱ्यावरील अनेक नोंदी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या अंगकाढूपणामुळे प्रलंबित आहेत. जळगाव तालुक्यात एकट्या पिंप्राळा महसूल मंडळात तब्बल ७०० नोंदी प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या नोंदी किंवा फेरफार मंजूर करवून घेण्यासाठी मंडळ अधिकारी कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. 

शेतकरी तहसील कार्यालयात जातात, पण मंडळ अधिकारी भेटत नाहीत. ते कार्यालयात नसतात. असे प्रकार सर्वत्र आहेत. शेतकरी यामुळे मेटाकुटीस आले आहेत. पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे.

मध्यंतरी जळगाव येथील तहसीलदारांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासोबत ऑनलाइन बैठक घेतली. त्यातही प्रलंबित फेरफार, नोंदी निकाली काढण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. अधिकाधिक दिवस काम करा, अधिकाधिक वेळ देऊन नोंदी निकाली काढा, शेतकऱ्यांच्या तक्रारी यायला नको, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु त्याची दखल मंडळ अधिकाऱ्यांनी न घेता दुर्लक्ष केले. 

हेलपाटे मारूनही काम होईना

 अनेक गावांमधील शासकीय जमिनीच्या अधीग्रहणासंबंधीदेखील नोंदी प्रलंबित असल्याची माहिती मिळाली. यामुळे शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तलाठ्यांनी आपले कर्तव्य केले, पण पुढे मंडळ अधिकाऱ्याकडे या नोंदी निकाली काढण्यासाठी वेळ, भाडे खर्च करावे लागत आहे. तहसील कार्यालयात दोन ते तीन तास थांबूनही काम होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

असाच प्रकार जामनेर, भुसावळ, चोपडा, यावल येथेही सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमध्ये काही भागात समन्वय नाही, असाही मुद्दा आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनाही जळगाव तालुक्यातील शेतकरी निवेदन सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. 
 


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...