कापूस बियाण्यातील कालबाह्य तंत्रज्ञान अमेरिका मागे घेणार

अमेरिकन बाजारपेठेतून तणनाशक सहनशील (एचटी) तंत्रज्ञान कपाशी बियाण्यातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
cotton seed
cotton seed

नागपूर : अमेरिकन बाजारपेठेतून तणनाशक सहनशील (एचटी) तंत्रज्ञान कपाशी बियाण्यातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भाने तेथील सरकारने नोटिफिकेशन देखील काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिन्जेंटा वगळता इतर कंपन्यांसाठी पुढील तीन वर्षांत याची अंमलबजावणी केली जाणार आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत ‘जीएम’ तंत्रज्ञानासह तणाला प्रतिकारक कापूस वाणाची (एचटीबीटी) लागवड केली जाते. गेल्या पंचवीस वर्षापासून हे तंत्रज्ञान वापरात आहे. टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाची कार्यक्षमता कमी होत असल्याने पुढील तीन वर्षांत जुने तंत्रज्ञान काढले जाणार आहे. ‘एचटीबीटी’ (हर्बीसाइड टॉलरंट) तंत्रज्ञानामुळे या भागात शेतकऱ्यांना तण नियंत्रणाकरिता मजुरांवरील अवलंबित्व कमी करता आले. मोठ्या क्षेत्रावर लागवड, त्यामुळे एरियल स्प्रेच्या माध्यमातून तणनाशकाची फवारणी होत असल्याने तणनियंत्रण सहज शक्य झाले. यामुळेच कापूस हंगामात अमेरिकेत १०० हेक्टर करिता एक व्यक्ती अशाप्रकारे मनुष्यबळाची गरज असते भारतात मात्र हे प्रमाण कितीतरी पट अधिक आहे.  भारतात कापूस हंगामात प्रति हेक्टर १११ व्यक्ती इतक्या प्रचंड प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळेच भारतात कापूस शेती तोट्याचा धंदा असल्याचे सांगण्यात आले. भारतात ‘जीएम’ तंत्रज्ञानाचा समावेश सरळ वाणांमध्ये केला गेला नाही. संकरित वाणांमध्येच हे तंत्रज्ञान असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी खासगी कंपनीकडून बियाणे खरेदी करावे लागते. भारत वगळता इतर कोणत्या देशात असा प्रकार होत नाही. उर्वरित सर्व कापूस उत्पादक देशांमध्ये सरळ वाणांमध्येच ‘जीएम’ तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अमेरिकेत सध्या ‘एचटी’ तंत्रज्ञान तीन वर्षांत कालबाह्य होणार आहे. त्या संदर्भाने नोटिफिकेशन देखील काढण्यात आले आहे. सिन्जेंटा कंपनी वगळता इतर कंपन्यांना आपली उत्पादने काढावी लागतील, अशी माहिती आहे.

प्रतिक्रिया तणाला प्रतिकारक तंत्रज्ञानासह कापसातील इतर काही कालबाह्य होऊ पाहणारे तंत्रज्ञान अनेक वर्षांपासून वापरात आहे. पुढील तीन वर्षांत ते काढण्याचा निर्णय अमेरिकेत स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. तसे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.  - डॉ. केशव क्रांती, तांत्रिक विभाग प्रमुख,  आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती, वॉशिंग्टन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com