agriculture news in marathi, americal fall army warm on crops, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने १०२८ हेक्टर क्षेत्र बाधित
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. १०२८ हेक्टर क्षेत्रावरील मका बाधित झाला आहे. अनेक भागांतील संपूर्ण क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. लष्करी अळीमुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. १०२८ हेक्टर क्षेत्रावरील मका बाधित झाला आहे. अनेक भागांतील संपूर्ण क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. लष्करी अळीमुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

जिल्ह्यात मक्याचा २५ हजार ३११ हेक्टरवर पेरा झाला आहे. गेल्या महिन्यापासून मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. हळूहळू मकापिकाचे नुकसान होऊ लागले. अनेक शेतकऱ्यांचे सत्तर टक्क्यांहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

दरम्यान, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यावर शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क केला. काही ठिकाणी अधिकारी बांधावर पोचले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरवात केली आहे. परंतु, शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन मिळत नाही. अगोदर दुष्काळ, त्यात आता मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करू लागले 
आहेत.

मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. काही ठिकाणी कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याचे मार्गदर्शन मेळावे, औषधफवारणी, एकात्मिक कीडव्यवस्थापन, याची माहिती दिली जात आहे. एकात्मिक कीडव्यवस्थापन करण्यासाठी २८ गावे निवडली आहेत. या गावात कृषी विभागाचे अधिकारी कामगंध सापळे लावत असून, शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

प्रतिक्रिया

जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून, आम्ही त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत आहोत. सध्या पाऊस नाही. त्यामुळे प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत असला, तरी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मेळावे घेत आहोत.
- राजेंद्र साबळे,जिल्हा कृषी अधीक्षक, सांगली.

अडीच एकर मका केलाय. हळूहळू लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मकापीक धोक्यात आले आहे. कृषी अधिकारी येऊन माहिती देत आहेत. पण, झालेले नुकसान भरून निघणारे नाही, त्यामुळे शासनाने नुकसानभरपाई द्यावी.
- दिलीप खिलारे, मका उत्पादक शेतकरी, झरे, ता. आटपाडी, जि. सांगली.

इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...
कोकणात नुकसानभरपाईचे वेगळे निकष लावा :...रत्नागिरी : ‘‘सांगली, कोल्हापूरप्रमाणेच कोकणातील...
सिंधुदुर्गात अतिवृष्टीने महावितरणचे चार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि...
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर...जालना : सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा...
परभणी जिल्ह्यात पाण्याअभावी फळबाग...परभणी : जिल्ह्यात गतवर्षीची दुष्काळी स्थिती आणि...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावच्या पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेचजळगाव ः खानदेशात अनेक भागांत पाऊसमान चांगले असले...
प्रौढांपेक्षा अळ्यांच्या वेगळ्या...गेल्या काही वर्षांमध्ये हानीकारक ठरणाऱ्या किडी...