agriculture news in marathi, American army worm detect in state, Maharashtra | Agrowon

नव्या लष्करी अळीचा महाराष्ट्रात शिरकाव !

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

पुणे ः अमेरिकेत मका पिकावर आढळणाऱ्या स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा (अमेरिकन लष्करी अळी) या नव्या किडीने  आता महाराष्ट्रातही शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील गणेश बाबर यांच्या ४० दिवसांच्या मका पिकामध्ये या नव्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला असल्याची नोंद डॉ. अंकुश चोरमुले यांनी केली. 

पुणे ः अमेरिकेत मका पिकावर आढळणाऱ्या स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा (अमेरिकन लष्करी अळी) या नव्या किडीने  आता महाराष्ट्रातही शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील गणेश बाबर यांच्या ४० दिवसांच्या मका पिकामध्ये या नव्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला असल्याची नोंद डॉ. अंकुश चोरमुले यांनी केली. 

भारतातील या किडीची पहिली नोंद शिमोगा विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर मका पिकात झाली होती. त्यानंतर कर्नाटकातील चिकमंगलूर, चित्रदुर्ग, दावणगिरी या जिल्ह्यांतही या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले होते. याबाबतची बातमी व महाराष्ट्रासाठीचा इशारा २९ ऑगस्टच्या ‘ॲग्रोवन’मध्ये देण्यात आला होता.

कीड नोंद व खात्री 
तांदुळवाडी (ता. माळशिरस) परिसरामध्ये खरिपात मका लागवड मोठ्या प्रमाणात असते. येथील गणेश बाबर यांच्या ४० दिवसांच्या मका पिकात सुमारे ३० ते ४० टक्के क्षेत्रावर स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा या किडीचा प्रादुर्भाव आढळला. त्याची ओळख व खात्री पटवण्यासाठी डॉ. अंकुश चोरमुले यांनी सदर मका पिकातील अळ्यांचे नमुने बंगळूरू येथील ‘नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रीकल्चरल इंसेक्ट रिसोर्स’ या संस्थेमध्ये पाठवले होते. डीएनए सिक्वेन्सिंग या तंत्राद्वारे या किडीची ओळख पटवण्यात आली असून, ती फॉल आर्मी वर्म असल्याबाबतचा अहवाल डॉ. व्यंकटेशन (प्रमुख शास्त्रज्ञ) यांच्याकडून नुकताच प्राप्त झाला आहे. 

किडीची ८० प्रकारच्या पिकांवर उपजीविका
स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ही कीड प्रामुख्याने अमेरिकन फॉल आर्मी वर्म या नावानेही ओळखली जाते. या किडीसाठी मका हे मुख्य यजमान पीक आहे. तसेच भात, भुईमूग, ऊस, ज्वारी, कापूस अशा सुमारे ८० पिकांवर ही कीड उपजीविका करू शकते. या किडीच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे. आफ्रिकेतील नायजेरिया देशांमध्ये २०१६ मध्ये प्रथम आढळलेल्या या किडीने आफ्रिकेतील ४४ देशांमध्ये शिरकाव केला आहे. या किडीमुळे आफ्रिका खंडामध्ये हजारो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.  


इतर अॅग्रो विशेष
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...