agriculture news in marathi, american fall army warm on maize crop, aurangabad, maharashtra | Agrowon

मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

एक एकरावर मक्याचे पीक आहे. अळी आली होती. दरम्यान, कृषी विभागाच्या आत्माने मेळावा घेऊन कीडनाशकांच्या उपायांबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे तूर्त अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. 
- रवी राजपूत, शेतकरी पाल, ता. फुलंब्री

औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील मका पिकावर हल्ला चढविला आहे. दोन्ही जिल्ह्यांत १० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राचे प्रमाण असले तरी केलेल्या उपाययोजनांमुळे तूर्त स्थिती नियंत्रणात आहे. उपाययोजनांच्या खबरदारीमुळे नुकसानीची पातळी अजून ओलांडली नसल्याचा दावा कृषी विभागाच्या यंत्रणेने केला आहे. मराठवाड्यात लष्करी अळीच्या आक्रमणाने ४१ हजार हेक्टरवर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तूर्त प्रादुर्भावग्रस्त क्षेत्र कृषी विभागाची यंत्रणा व तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यात प्रामुख्याने मका पीक घेतले जाते. औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी १ लाख ५३ हजार हेक्‍टरवर तर जालना जिल्ह्यात सरासरी ६० हजार हेक्‍टरवर मकाची लागवड केली जाते. यंदाच्या खरिपात औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या पुढे जावून १ लाख ६० हजार हेक्‍टरवर आजवर मका पिकाची लागवड झाली आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ४७ हजार ८२० हेक्‍टरवर मका पिकाची लागवड झाली. 

यंदाच्या खरिपात अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागासह वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प व कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या समन्वयातून लष्करी अळी नियंत्रणासाठी जागर मोहीम राबविण्यात आली. हंगामाच्या सुरवातीलाच औरंगाबाद येथे अळी नियंत्रण व जागृती अभियानाची सुरवात करून कृषी विभाग, कृषी विद्यापीठांनी आपली जागरूकता स्पष्ट केली होती. 

अभियानाची सुरवात झाल्याबरोबर जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यात काही गावांत व त्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध तालुक्‍यांतील मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. तेव्हापासून आजतागायत तज्ज्ञांच्या पाहणीनुसार औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, खुल्ताबाद आदी तालुक्‍यांतील २० ते ४० टक्‍के पिकावर प्रादुर्भाव झाला आहे. एरवी एक हजाराच्या आत एकूण पीक कालावधीत फवारणी करावी लागणाऱ्या उत्पादकांचे हजार रुपये दोन फवारण्यांवर खर्च झाले आहेत.

प्रतिक्रिया

पाच ते सहा पानांवर मक्याचे पीक आहे. प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांनी पिकाचे बारकाईने निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास शिफारशीनुसार फवारणी करावी. 
- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना. 

अमेरिकन लष्करी अळीचा धोका ओळखून जागृतीचे काम करण्यात आले. नुकसानीची पातळी अजून ओलांडली नाही. पाऊस नाही, अळीला पोषक वातावरण असल्याने धोका आहे. प्रादुर्भावग्रस्त क्षेत्र निरीक्षणाखाली असून उपाययोजनाही सूचविल्या आहेत.
- डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद.

विभाग जिल्हा, तालुका स्तरावर यंत्रणेला अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणाविषयी सखोल माहिती दिली. अभियानाद्वारे प्रक्षेत्र भेटीतून थेट शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे. पावसाच्या उघडिपीमुळे प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात वाढ होते आहे. शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी फवारण्याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांनी निरीक्षणेही नोंदविण्याची गरज.
- डॉ. एस. बी. पवार, सहयोगी संचालक संशोधन.

 


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार...नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली...
सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस...सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
कोरोनाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाईन...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोलापुरात वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी...सोलापूर  : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
पुणे जिल्हा बॅंकेकडून पीक कर्ज...पुणे ः शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी विरोधात...नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना...
अकोला जिल्ह्यात फूलशेतीचे झाले मातेरेअकोला ः जिल्ह्यात फूलशेतीचे माहेरघर म्हणून...
मोर्शीत हमीभावाने तूर खरेदी रखडलीअमरावती ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक...नांदेड  : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणीत घरपोच भाजीपाला विक्री ठरतेय...परभणी ः मिरखेल आणि देशमुख पिंपरी येथील...
विदर्भात फुलांची उलाढाल ठप्पनागपूर  ः बंद काळात फळे, भाजीपाला...
तिडे येथे १४५ एकरांवरील कलिंगडे...चिपळूण, जि. रत्नागिरी  ः मंडणगड तालुक्यातील...
सांगलीत शिल्लक ऊसाचा प्रश्‍न भेडसावणारसांगली : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम...