नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव

मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव
मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव

नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मक्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत उत्पादन खर्चासह पीक संरक्षणाचा खर्च वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

जिल्ह्यातील मका लागवडीचे प्रस्तावित क्षेत्र १ लाख ४३ हजार ६४५ हेक्टर असून, १४ तालुक्यांमध्ये २ लाख ९ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. एकंदरीतच मका लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. सुरुवातीला मका पिकावर  लष्करी अळीचा प्रादुर्भाव ९० टक्क्यांपेक्षा अधिक दिसून आला. परिणामी, कीटकनाशकांवरील खर्च वाढला. पीक संरक्षणाचा हा वाढता खर्च शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणारा आहे. सध्याही या अळीचा प्रादुर्भाव २५ ते ३० टक्क्यांपर्यंत असून, मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होत आहे. लष्करी अळीने पाने कुरतडून खाल्ल्याचे दिसून आले आहे.

शेतकऱ्यांनी रासायनिक व जैविक कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या. मात्र याचा फारसा परिणाम दिसला नाही. नुकसान पातळी अधिक वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी मक्यावर नांगर फिरवला तर काहींनी पीक उपटून टाकले. सध्या मका पीक तुऱ्यावर आले असून, लष्करी अळी कणसामध्ये प्रवेश करून आतील भागाचे नुकसान करत आहे. त्यामुळे उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  

मका पिकासाठी दरवर्षी एकरी १० हजार रुपये खर्च येतो. मात्र चालू वर्षी तो दुप्पट झाला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे. तसेच महागडी कीटकनाशके फवारूनही परिणाम दिसत नसल्याने तांत्रिकदृष्ट्या ही बाब तपासून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. 

मक्याचे पीक दृष्टिक्षेपात  

  • जिल्ह्यातील एकूण लागवड : २ लाख ९ हजार ८५६ हेक्टर
  • प्रादुर्भाव झालेले क्षेत्र : ४९ हजार ९९३ हेक्टर
  • बाधित शेतकरी : ३६ हजार ६७५ 
  • प्रादुर्भाव असलेली गावे :     ७६६ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com