agriculture news in Marathi American fall army worm attack in Khandesh Maharashtra | Page 2 ||| Agrowon

खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा शिरकाव 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 जुलै 2021

खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी आहे. पण २५ ते ४० दिवसांच्या पिकात अमेरिकन लष्करी अळीचा शिरकाव झाला आहे. 

जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी आहे. पण २५ ते ४० दिवसांच्या पिकात अमेरिकन लष्करी अळीचा शिरकाव झाला आहे. 

धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा, जळगावमधील रावेर, यावल, जळगाव, चोपडा आदी भागांत मका पीक आहे. कापूस, मुगाऐवजी अनेकांनी मक्याची लागवड केली. मक्याचे दर एप्रिल ते जूनदरम्यान स्थिर होते. यामुळे मक्याकडे शेतकरी वळले. पण या हंगामातही पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शिरपुरात अधिक प्रादुर्भाव आहे. जळगावमधील एरंडोल, पाचोरा, चोपडा, जळगाव भागातही लष्करी अळीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. कृषी विभाग कामगंध सापळे व शिफारशीत कीटकनाशकांच्या योग्य मात्रांनुसार फवारणीचे आवाहन करीत आहे. शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांची खरेदी बाजारातून करावी लागत आहे. 

तापी, गिरणा, अनेर आदी नद्यांच्या क्षेत्रात मका पीक अधिक आहे. या भागात मध्यंतरी पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांनी सिंचन करून पीक वाचविले. पण पिकात २५ ते ४० दिवसांत अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. काही भागात हा प्रादुर्भाव अधिक आहे. नुकसान २५ ते ३० टक्के आहे. तर काही भागांत नुकसान २० टक्के आहे. अळीचा अटकाव करण्यासाठी शेतकरी फवारण्या घेत आहेत. कामगंध सापळे एकरी सहा यानुसार लावत आहेत. यात कीडनाशके, सापळ्यांवर एकरी किमान तीन हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना या अळीमुळे अधिकचा करावा लागत आहे. कीडनाशके, सापळे मोफत किंवा ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना मंडळ स्तरावर वितरित करावेत, अशी मागणी केली जात आहे. कारण हा खर्च पुढेही करावाच लागेल. 

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला 
सापळ्यांमधील ल्यूर बदलावे लागतात. एक ल्यूर ७० ते १०० रुपयांत मिळतो. तसेच तीनदा कीडनाशके फवारणी करावी लागेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रात सध्या दिसत आहे. १२ जुलैनंतर लागवड केलेल्या पिकात हा प्रकोप आढळलेला नसल्याचे सांगण्यात आले. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...