agriculture news in Marathi, American fall army worm attack in Solapur District, Maharashtra | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला फस्त

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

माझ्याकडे ७० दुभत्या गाई आहेत. त्यांना जगवण्याची कसरत सुरू आहे. दुष्काळामुळे चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. दीड महिन्यापूर्वी आठ एकरवर चाऱ्यासाठी मका पेरली. पण चार-पाच पाने फुटल्यापासून लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला. नंतर दोन-तीन वेळा फवारण्याही केल्या. पण, अळी काही नियंत्रणात आली नाही. आतापर्यंत मक्यावर कधीच असला प्रकार नव्हता, मला तर शंका यायला लागली आहे, यामागे काही षड़्यंत्र आहे का शोधावे. 
- पद्माकर भोसले, शेतकरी, पापरी, ता. मोहोळ

सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा खरीप हंगामात पेरणी झालेल्या जवळपास २३ हजार हेक्‍टरवरील मक्‍याचे क्षेत्र अमेरिकन लष्करी अळीने फस्त केले. 

जिल्ह्याची पावसाची एकूण सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. पण, सरासरीच्या निम्माही पाऊस अद्याप झाला नाही. त्यामुळे खरीप वाया गेला आहे, आता रब्बीच्या पेरणीचे सगळे गणित पावसावरच आहे आणि पावसाचे आता केवळ १५ दिवस उरले आहेत. या कालावधीत किती पाऊस पडणार, याबाबतही साशंकताच आहे. 

सोलापूर जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र जवळपास आठ लाख हेक्टर आहे. त्यात सुमारे साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र एकट्या ज्वारीचे आहे. पण मक्यावरील लष्करी अळीच्या वाढत्या प्रादुर्भावाने ज्वारी आणि बाजरीवरही हे संकट ओढावण्याची शक्यता आहे. 

मक्याचे क्षेत्र फस्त
यंदा उन्हाळी हंगामात आणि खरिपात ज्यांच्याकडे थोडे पाणी आहे, त्यांनी तसेच काहींनी पावसाच्या भरवशावर मका घेतली. पण त्यांना मक्‍यावरील लष्करी अळीने हैराण केले. जिल्ह्यात खरिपात पेर झालेले मकेचे सर्वच्या सर्व २३ हजार हेक्टर क्षेत्र लष्करी अळीने फस्त केले आहे. जिल्ह्यातील प्रामुख्याने सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, करमाळा, बार्शी, दक्षिण सोलापुरात या अळीचा सर्वाधिक प्रभाव दिसत आहे. यंदा पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिने उलटले, परंतु पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावलेली नाही. 

 २५० हून अधिक शेतीशाळा
मक्‍यावरील या वाढत्या प्रादुर्भावामुळे कृषी विभागाने गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात शेतीशाळांचे आयोजन करून प्रबोधन सुरू केले. आतापर्यंत जवळपास २५० हून अधिक शेतीशाळा गावागावात घेतल्या आहेत. पण, वातावरणातील सततच्या बदलामुळे आणि या अळीला पोषक वातावरण राहत असल्याने ही अळी आजही हाताबाहेर आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...