agriculture news in Marathi, American fall army worm on cotton in Khandesh, Maharashtra | Agrowon

खानदेशातही कापसावर लष्करी अळी
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

आमच्या भागात मका पिकानजीक कापसाच्या शेतात ही अळी दिसल्याचे शेतकरी सांगत आहेत. याबाबत तातडीने सर्वेक्षण करून उपाय करायला हवेत.
- नाना पाटील, शेतकरी, पिंप्री खुर्द, जि. जळगाव

जळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील अनेक भागात कापूस पिकावर अमेरिकन लष्करी अळी आढळली आहे. मका व ज्वारी पिकांनजीक असलेल्या कापूस पिकात ही अळी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

खान्देशात (नंदुरबारसह) सुमारे आठ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. सर्वाधिक पाच लाख हेक्टरवर लागवड जळगाव जिल्ह्यात झाली. खान्देशात पूर्वहंगामी लागवड दीड लाख हेक्टरवर आहे. लष्करी अळी पूर्वहंगामी कापूस पिकात दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, जळगाव आदी भागात ही अळी दिसली आहे. तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर व धुळे तालुक्यांत ही अळी १५ दिवसांपूर्वी कापूस पिकात फोफावली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

ज्या कापूस पिकाच्या क्षेत्रानजीक मका पीक आहे, त्यात कापूस पिकात पहिल्या तीन, चार ओळीत ही अळी आहे. ती कैऱ्या पोखरून टाकत आहे. यामुळे बोंड उमलनार नाही. ज्या कैरीत ही अळी शिरते, त्यात १०० टक्के नुकसान करीत आहे. अद्याप प्रकोप सुरवातीच्या स्थितीत आहे. पण यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून, उपाययोजना कुठल्याही सुरू नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कापूस खान्देशचे प्रमुख पीक आहे. त्यावरील लष्करी अळीचे संकट दूर झाले नाही तर शेतकरी पुरते अडचणीत येतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अळीबाबत सर्वेक्षण झालेले नसल्याने नुकसानीची पातळी, क्षेत्र याबाबत नेमकी माहिती कापूस तज्ञ व कृषी यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. 

‘घाबरून जाण्याचे कारण नाही’
मका पिकानजीक जेथे कापूस पीक आहे, तेथे ही अमेरिकन लष्करी अळी असू शकते. पण कापूस पिकात ही अळी जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोफावल्याची स्थिती नाही. तसेच ही अळी कापूस पिकात अधिक दिवस जिवंत राहू शकत नाही. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी माहिती कापूस संशोधन केंद्रातील पैदासकार संजीव पाटील यांनी दिली. 

प्रतिक्रिया
मका पिकावरील लष्करी अळी कापूस, ज्वारी पिकात आली आहे. तिचा कापूस पिकातील अटकाव लवकर झाला नाही तर शेतकरी पुरते आर्थिक संकटात सापडतील.
- शिवाजी बोरसे, शेतकरी, चिंचखेडा (जि. धुळे)

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...